भाजपने खातं खोललं; शाहदा मतदारसंघात राजेश पडवी, सिंदखेडा येथून जयकुमार रावल विजयी
दरम्यान, इतरही विविध जागांवरील आकडेवारी हाती येत आहे. नंदुरबार येथून राजेंद्र गावीत विजयी झाल्याचे समजते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीसुद्धा जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे.
Maharashtra Assembly Election Results 2019: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये शाहदा मतदारसंघातून उमेदवार राजेश पडवी यांच्या रुपात भाजपने खातं खोललं आहे. तर, शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून जयकुमार रावल हा भाजपचा दुसरा उमेदवार विजयी झाला आहे. दरम्यान, इतरही विविध जागांवरील आकडेवारी हाती येत आहे. नंदुरबार येथून राजेंद्र गावीत विजयी झाल्याचे समजते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीसुद्धा जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे.
दरम्यान, कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे विजयी झाल्याचे वृत्त आहे. प्राप्त आकडेवारीनुसार, भाजप क्रमांक एक, शिसेना दुसऱ्या, राष्ट्रवादी तिसऱ्या तर काँग्रेस चौथ्या क्रमांकावर आहे. हे कल निकालात परावर्तीत झाले तर, भाजपेच 220 जागांचे लक्ष्य अपूर्ण राहू शकते. भाजप हा विजयाबाबत नेहमीच विविध दावे करत आला आहे. परंतू, सर्वच वेळी हे दावे प्रत्यक्षात उतरु शकत नाहीत,असेच काहीसे दाखवणारी ही आकडेवारी सध्यातरी दिसत आहे. (हेही वाचा, परळी: भावा-बहिणीच्या लढतीमध्ये जनतेची धनंजय मुंडेंना साथ; पंकजा ताईंचे भावनिक राजकारण ठरू शकते कुचकामी)
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील एकूण 288 जागांपैकी शिवसेना ही 124 तर भाजप हा 164 जागांवर लढतो आहे. उर्वरीत जागांव युतीचे मित्रपक्ष लढत आहेत. तर, दुसऱ्या बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष आघाडी करुन लढत आहेत. काँग्रेस 147 तर, राष्ट्रवादी 124 जागा लढवत आहे. उर्वरीत जागा दोन्ही पक्षांनी समाजवादी पक्ष, आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल, शेतकरी कामगार पक्ष अशा मित्रपक्षांना सोडल्या आहेत.