Madhya Pradesh Assembly Elections Results 2018: मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस फ्रंटवर भाजप बॅकफूटवर

मध्य प्रदेशमध्ये एकूण 230 जागांपैकी 144 जागांचे प्राथमिक कल हाती येत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार काँग्रेस 80 भाजप 74 तर इतर पक्ष 1 जागेवर आघाडीवर आहेत. 116 हा येथे सत्तास्थापनेसाठी बहुमताचा आकडा आहे.

BJP VS CONGRESS| (Photo courtesy: archived, edited, representative image)

Madhya Pradesh Assembly Elections Results 2018: मध्य प्रदेश (Madhya Pradesh) विधानसभा निवडणुक (Assembly Elections) निकालाचे प्राथमिक कल भाजपसाठी धक्कादाय असल्याचे पाहायला मिळत आहे. हाती आलेल्या प्राथमिक कलानुसरा काँग्रेस ( Congress) आघाडीवर आहे. तर, भाजप (BJP) पिछाडीवर. दोन्ही पक्षांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेशमध्ये एकूण 230 जागांपैकी 144 जागांचे प्राथमिक कल हाती येत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार काँग्रेस 80 भाजप 74 तर इतर पक्ष 1 जागेवर आघाडीवर आहेत. 116 हा येथे सत्तास्थापनेसाठी बहुमताचा आकडा आहे.

काही मिनीटांपूर्वीच कल हाती आला तेव्हा, काँग्रेस भाजपपेक्षा दहा जागांनी आघाडीवर होती. अद्याप कोणत्याही ठिकाणचा निकाल लागला नसून मतमोजणी सुरु आहे. मतमोजणी सुरु झाली तेव्हा काहीच वेळात, भाजपने 8 जागांवर आघाडी घेतली. तर, काँग्रेस 5 जागांवर आघाडीवर होती. मात्र, काही काळात हे चित्र बदलायला सुरुवात झाली. काँग्रेसने अल्पवधीतच 55 जगांवर आघाडी घेतली. त्यावेळी भाजपनेही टक्कर देत 51 जागांवर आघाडी घेतली होती. (हेही वाचा, Telangana Assembly Election Results 2018 : तेलंगणा विधानसभा निवडणूक निकाल, TRS बहुमताच्या जवळ)

दरम्यान, राजस्थानमध्ये 199 जागांसाठी काँग्रेस 78 जागेवर आघडीवर आहे तर भाजप 61 जागांवर आघडीवर आहे. इतर पक्ष 8 ठिकाणी आघडीवर आहेत. छत्तीसगढमध्ये एकूण 90 जागांसाठी काँग्रेस 40, भाजप 30 तर इतर पक्ष 7 जागांवर आघाडीवर आहेत. तेलंगणामध्ये 119 जगांपैकी टीआरएस 40, कांग्रेस+टीडीपी 37 जागांवर आघाडी आहेत. तर, भाजप 06 इतर 08 जगांवर आघाडीवर आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now