ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा? पक्षात अध्यक्षपद सांभाळायची इच्छा

त्यामुळे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी पदाचा राजीनामा सोपवला.

लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर टीएमसी (TMC) पक्षाचा दारुण पराभ झाला. त्यामुळे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी पदाचा राजीनामा सोपवला. तसेच पक्षात फक्त अध्यक्षपद सांभाळण्याची इच्छा बॅनर्जी यांनी वर्तवली आहे.

तर एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, टीएमसी सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी एका बैठकीत मुख्यमंत्री पदावर राहायचे नसल्याचे म्हटले. परंतु पक्षात फक्त अध्यक्षपद सांभाळायचे असल्याचे ही त्यावेळी म्हटले. मात्र ममता बॅनर्जी यांचा बैठकीत मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याचा अर्ज स्विकारला नाही.

भाजपला 42 पैकी 18 जागांवर विजय मिळाला असून तृणमूल काँग्रेसला 23 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाली आहे. हा निकाल तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.