Lok Sabha Elections 2019 Aaj Tak-Axis Exit Poll LIVE STREAMING: 'आज तक' चा एक्झिट पोल लाईव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यमातून पहा मतदारांचा कौल कुणाच्या बाजुने?
आज तक चा एक्झिट पोल इथे पहा लाईव्ह
Lok Sabha Elections Exit Polls 2019: गेल्या महिन्याभरापासून देशासह राज्यात सुरु असलेली लोकसभा निवडणुकीची धामधुम आज थंडावली. कारण आज देशात मतदानाचा अंतिम टप्पा म्हणजेच सातवा टप्पा पार पडला. या निवडणुकीत देशात सात टप्प्यात तर महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान झाले. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर लोकांना उत्सुकता असते ती निकालाची. म्हणूनच आज अनेक प्रसारमाध्यमांच्या आधारे एक्झिट पोल सांगण्यात येतो. या एक्झिट पोल द्वारे जनमताचा कौल कोणत्या राज्यात नेमका कोणत्या पक्षाकडे झुकतो, हे अनेक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्यात येणार आहे.
आज तक चा एक्झिट पोल कुठे पहाल?
आज तक-अॅक्सिससह निवडणूकीच्या निकालाचे अंदाज व्यक्त करेल. तर Network 18 लोकमत-IPSOS सह, इंडिया टुडे-अॅक्सिस, एबीपी-नेल्सन, इंडिया टीव्ही-CNX या संस्था, न्यूज चॅनल्स आपले अंदाज आज व्यक्त करणार आहेत.मात्र ‘आज तक’चा लाईव्ह एक्झिट पोल खाली पहा…
देशात पहिल्या टप्प्यात 20 राज्यांतील 91 मतदारसंघ, दुसऱ्या टप्प्यात 14 राज्यांतील 97 मतदारसंघ, तिसऱ्या टप्प्यात 14 राज्यातील 115 मतदारसंघ, चौथ्या टप्प्यात 9 राज्यांतील 71 मतदारसंघ, पाचव्या टप्प्यात 7 राज्यांत 51 मतदारसंघ, सहाव्या टप्प्यात 7 राज्यातील 59 मतदारसंघात आणि सातव्या टप्प्यात 8 राज्यातील 59 मतदासंघात मतदान झाले. 23 मे रोजी मतमोजणी झाल्यावर जनमताचा कौल स्पष्ट होईल.
नेदरलँडमध्ये समाजशास्त्र आणि माजी राजकीय नेते मार्सेल वॉन डॅम यांनी एक्झिट पोल या संकल्पनेला सुरूवात केली. 15 फेब्रुवारी 1967 रोजी पहिला एक्झिट पोल आला होता.