Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा हाय होल्टेज ड्रामा! बारामतीत सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का; सुळे यांचे प्रचारप्रमुख सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार

सुप्रिया सुळे यांचे प्रचार प्रमुख असलेले प्रवीण माने अजित पवार गटामध्ये सहभागी झाले आहेत. त्यांनी अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Supriya Sule | Twitter

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूका जाहीर झाल्यापासून बारामती लोकसभा मतदारसंघ मोठा चर्चेत आला होता. आधी सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्याविरोधात भाजपने सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)यांना उमेदवारी दिली. आता तर सुप्रिया सुळे यांचे प्रचार प्रमुख असलेले प्रवीण माने(Praveen Mane) अजित पवार गटामध्ये सहभागी झाले आहेत. ही भाजपचीच रणनिती असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे यांदाची लोकसभा निवडणूक सुप्रिया सुळेंसाठी मोठी आव्हानात्मक ठरणार हे स्पष्ट आहे. भाजपकडून चारही बाजूने सुप्रिया सुळे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत आहे.(हेही वाचा :Lok Sabha Election 2024: बारामतीमध्ये वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या पाठिंब्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी मानले आभार ! )

अजित पवार (Ajit Pawar)हे विकसासाठी भाजप बरोबर गेले आहेत. आम्ही देखील विकास व्हावा यासाठी अजित पवार यांच्याबरोबर जात आहोत. अजित पवारांनी अनेक विकास कामे केली आहेत. आम्ही ठामपणे अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. 'माने कुटुंब पवार कुटुंबीयांसोबत राहिलं आहे. अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी माने कुटुंब त्यांच्याबरोबर राहणार आहे. आजपासून आम्ही त्यांचा प्रचार सुरू करत आहोत', अशा शब्दांत प्रवीण मानेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सक्रिय होवून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, असंही प्रविण माने यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलं.