Kerala Assembly Election Results 2021: केरळमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची कमाल, 3 पैकी 2 जागांवर मिळवला विजय

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार थॉमस के थॉमस यांनी कुट्टनाड मतदारसंघातून केरळ विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला आहे. यंदाच्या केरळ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आपले तीन उमेदवार मैदानात उतरवले होते त्यापैकी दोन उमेदवार विजयी झाले आहे तर एकाला पराभव पत्करावा लागला आहे. राष्ट्रवादीचे आणखी एक उमेदवार आणि A K ससीन्द्रण यांनी देखील विजयाची नोंद केली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस (Photo Credits-Facebook)

Kerala Assembly Election Results 2021: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (Nationalist Congress Party) उमेदवार थॉमस के थॉमस (Thomas K Thomas) यांनी कुट्टनाड मतदारसंघातून (Kuttanad Constituency) केरळ विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला आहे. यंदाच्या केरळ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आपले तीन उमेदवार मैदानात उतरवले होते त्यापैकी दोन उमेदवार विजयी झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांचे (Sharad Pawa) खास विश्वासू विद्यमान आमदार व वाहतूक मंत्री ए के शशीधरन पुन्हा एकदा इलाथूर विधानसभा मतदार संघातून रिंगणात उतरले होते. शशीधरन यांनी जोरदार मुसंडी मारत विजय मिळवला आणि भाजप उमेदवार टी.पी. जयाचंद्रन मास्टर यांना तिसऱ्या स्थानावर थकलेले. दरम्यान, कुट्टुनाड मतदार संघातून के थॉमस यांनी केरळ काँग्रेसचे उमेदवार जेकब अब्राहम यांना धूळ चारली आहे. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी शरद पवार यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर केली. राष्ट्रवादीचे आणखी एक उमेदवार आणि A K ससीन्द्रण यांनी देखील विजयाची नोंद केली आहे. (Kerala Assembly Election Results 2021: केरळ मध्ये LDF ची सलग दुसऱ्यांना सत्तेकडे वाटचाल)

“कुट्टनाद मतदारसंघातून केरळ विधानसभा निवडणुकीत विजय मिळविल्याबद्दल राष्ट्रवादीचे उमेदवार श्री थॉमस के थॉमस यांचे अभिनंदन. यशस्वी कालावधीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा!” माजी मंत्री (दिवंगत) थॉमस चांडी यांचे बंधू थॉमस के थॉमस यांना कुट्टनाडमधून विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला होता. यापूर्वी चांडी यांनी 2006 ते 2019 पर्यंत मरे पर्यंत कुटानाडचे तीन वेळा प्रतिनिधित्व केले होते. दुसरीकडे, तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत आणि पश्चिम बंगालमधील विजयाबद्दल शरद पवार यांनी आज द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टालिन आणि तृणमूल काँग्रेस प्रमुख व राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले. त्यांनी लिहिले, “एमके स्टालिन तुमच्या विजयाबद्दल अभिनंदन, खरोखरच योग्य असा विजय आहे! ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला आहे अशा लोकांची सेवा करण्यासाठी शुभेच्छा!” ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा देताना पवारांनी लिहिले, "आपल्या जबरदस्त विजयाबद्दल @MamataOfficial ला अभिनंदन! लोकांच्या कल्याणासाठी आणि महामारीला सामूहिकरीत्या सामोरे जाण्याचे आपण आपले कार्य चालू ठेवू या.”

दरम्यान, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने (मार्क्सवादी) तीन जागांवर विजय नोंदवला आणि आणखी 54 वर आघाडी कायम राखत निवडणूक आयोगाच्या ताज्या ट्रेंडनुसार सत्ताधारी LDF पुन्हा केरळमध्ये सरकार स्थापन करणार असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या नेतृत्वात एलडीएफला 95 आणि 100 अधिक जागा मिळू शकतात. यापूर्वी 2016 मध्ये त्यांना 91 जागांवर समाधान मानावे लागले होते. केरळचे आरोग्यमंत्री के. शैलजा यांनी मट्टानूर मतदार संघातून विक्रमी 60,963 मतांनी विजय मिळवला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now