Lok Sabha Election Results 2019: आता YouTube बघता येणार लोकसभेचे लाइव निकाल, प्रसार भारतीने गुगलशी केली हातमिळवणी
गुगलने प्रसार भारती शी हातमिळवणी केल्यामुळे आता येत्या 23 मे ला जाहीर होणारे लोकसभेचे निकाल युट्यूबवर लाइव्ह पाहता येणार आहे.
लोकसभा निवडणूक 2019 च्या निकालांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली असून, आता हे निकाल तुम्हाला लाइव्ह पाहता यावे यासाठी गुगलने एक ऐतिहासिक अशे पाऊल उचचले आहे. गुगलने प्रसार भारती शी हातमिळवणी केल्यामुळे आता येत्या 23 मे ला जाहीर होणारे लोकसभेचे निकाल युट्यूबवर लाइव्ह पाहता येणार आहे. प्रसार भारतीच्या अधिका-यांनी असे सांगितले आहे की. "येत्या 23 मे ला गुगल आणि प्रसार भारती मिळून लोकतंत्रचा मोठा सोहळा साजरा करणार आहेत."
प्रसार भारती चे सीईओ शशी शेखर वेम्पती यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, युट्यूबच्या वेबसाइटच्या किंवा अॅपच्या माध्यमातून जी गोष्ट सर्वात वर दिसेल. तीच असेल डीडी न्यूजची न्यूज स्ट्रीमिंग जी निकालांचे अपडेट देत राहील. तसेच ही एक प्रकारची लँडिंग स्क्रीन असेल, असेही ते पुढे म्हणाले. जेव्हा तुम्ही युट्यूबवर त्या संबंधित लिंक वर क्लिक कराल ते डीडी न्यूजचे लाइव युट्यूब चॅनल असेल. त्याशिवाय ह्या विंडोमध्ये दूरदर्शनच्या 14 भाषांच्या क्षेत्रीय स्टेशनांचे सरळ प्रसारण करण्याचाही पर्याय असेल.
हे प्रसारण म्हणजे मतमोजणीच्या बाबतीत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूपच पारदर्शकतेची आणि विश्वासार्हतेची भूमिका बजावेल. कारण ब-याचदा असे पाहिले गेले आहे की, मतमोजणीच्या 2-3 तास आधि खूपच गडबड आणि चुकीची रिपोर्टिंग पाहायला मिळते. म्हणूनच ह्या लाइव्ह प्रसारणामुळे लोकांमध्ये निवडणुकीच्या निकालाची पारदर्शकता पाहायला मिळेल.
पंतप्रधान कोण होणार ते कळवा आणि 'Zomato' वर कॅशबॅक-सूट मिळवा
युट्यूबवरील हे लाइव्ह प्रक्षेपण 23 मे पुर्ण दिवस सुरु असेल. सात टप्प्यांमध्ये झालेली ही लोकसभा निवडणूक 2019 ही 11 एप्रिल पासून 19 मे पर्यंत झाली.