Ghulam Nabi Azad: गुलाम नबी आझाद नवा पक्ष स्थापन करणार, काश्मीर युनिटपासून सुरुवात

गुलाम नबी आझाद स्वतचा नवा पक्ष स्थापन करणार असुन काश्मीर युनिटपासून पुढील 14 दिवसांत या पक्षाची सुरुवात करण्यात येणार आहे.

Ghulam Nabi Azad (Photo Credit: IANS)

काँग्रेसचे (Congress) बडे नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा (resignation) दिला आहे. गेल्या आठवड्यातचं गुलाम नबी आझाद यांनी जम्मू-काश्मीर (Jammu & Kashmir) काँग्रेसच्या प्रचार समितीच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. त्यापाठोपाठ आता गुलाम नबी आझाद यांचा सर्व पदाचा राजीनामा हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. एवढचं नाही तर गुलाम नबी आझाद लवकरच स्वतचा  नवा पक्ष (Political Party) स्थापन करणार  असुन काश्मीर युनिटपासून (Kashmir Unit) पुढील 14 दिवसांत या पक्षाची सुरुवात करण्यात येणार आहे. गुलाम नबी आझाद यांचे निकटवर्तीय जीएम सरोरी (G. M. Saroori) यांनी याबाबत माहिती दिली आहे.

 

शुक्रवारी राजीनामा (Resignation) दिल्याच्या काही तासांनंतर गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) म्हणाले होते की ते लवकरच एक नवीन पक्ष (Political Party) सुरू करतील आणि त्याचे पहिले युनिट जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu & Kashmir) स्थापन केले जाईल. तसेच मला आत्ता राष्ट्रीय पक्ष (National Political Party) सुरू करण्याची घाई नाही, पण जम्मू-काश्मीरमधील निवडणुकांची शक्यता लक्षात घेऊन मी तेथे लवकरच एक युनिट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जीएम सरोरी (G. M. Saroori) सारख्या अनेक बड्या नेत्यांनी आपला राजीनामा देत गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad)  यांना पाठींबा दर्शवला आहे. (हे ही वाचा:- Nitin Gadkari: निवडणूकीबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं सुचक वक्तव्य, पुढील निवडणूकीतील रणनीतीबाबत घोषणा)

 

राजीनाम्यानंतर गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad)  यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonai Gandhi) यांना पाच पाना राजीनामा पत्र लिहलं होत. त्यात त्यांनी राहुल गांधीवर (Rahul Gandhi) टीकेचे बाण सोडत भारत जोडो (Bharat Jodo) यात्रेऐवजी काँग्रेस जोडो (Congress Jodo) यात्रा काढावी, असा सल्ला दिला होता. गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) बराच काळ काँग्रेसवर (Congress) नाराज होते. तरी गुलाम नबी आझादांनी राजीनामा (Ghulam Nabi Azad Resignation) देण्यापर्यतचं पाऊल उचलावं नेमक कारण काय हे अजुन तरी पुढे आलेलं नाही. तर आझादांच्या या निर्णयाचा कॉंग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now