Ghulam Nabi Azad: मी माझ्या पक्षाला हिंदुस्थानी नाव देईन, गुलाम नबी आझादांची मोठी घोषणा
मी माझ्या पक्षाला एक हिंदुस्थानी नाव देईल असं गुलाम नबी आझाद यांनी आपल्या सभेतून जाहीर केलं आहे.
आज देशाच्या राजकीय पटलावर दोन मोठ्या घडामोडी घडल्यात आणि दोन्ही कॉंग्रेसशी संबंधीत. आज दिल्लीच्या (Delhi) रामलीला मैदानात (Ram Leela Ground) कॉंग्रेसकडून ‘मेहंगाई पर हल्ला बोल’ ही मेगा रॅली (Mega Rally) काढण्यात आहे. या रॅलीत कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी महागाईसह बरोजगारीच्या मुद्दयावरुन केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. तर दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसला नुकताच रामराम ठोकलेले बडे नेते गुलाम नबी आझाद यांनी स्वतच्या स्वतंत्र पक्षाची घोषणा केली. आज कॉंग्रेसचे आजी आणि कॉंग्रेसचे माजी असे दोन्ही नेते मोठ्या चर्चेत राहीले. पण लक्षवेधी ठरलं ते गुलाम नबी आझादांची कॉंग्रेसमधली पहिली स्वतंत्र्य सभा. या सभेवर अनेकांचं लक्ष लागलं असुन दरम्यान मोठी घोषणा होणार असल्याची चर्चा होती.
सभेसाठी उपस्थित होत असताना गुलाम नबी आझाद आज यांचं जम्मू येथे जंगी स्वागत करण्यात आलं. जम्मूतील नागरिकांना संबोधित करतांना गांधी घराण्यासह कॉंग्रेसवर निशाणा साधला. आझाद म्हणाले "काँग्रेसचे लोक आता बसमध्ये तुरुंगात जातात नंतर ते डीजीपी, आयुक्तांना फोन करतात, त्यांचे नाव लिहून घेतात आणि तासाभरात पोलिसांच्या ताब्यातून सुटतात त्यामुळेच काँग्रेसचा विकास होऊ शकला नाही," अशी खोचक टीका गुलाम नबी आझाद यांनी कॉंग्रेसवर केली आहे. तसेच काँग्रेस आम्ही आमच्या रक्ताने बनवली आहे, संगणकाने किंवा ट्विटरने नाही. लोक आमची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांचा आवाका फक्त संगणक आणि ट्विटपुरता मर्यादित आहे, त्याच्या ट्रोलिंगमुळे माझ्या प्रतिमेवर जराही फरक पडणार नाही असं आझाद म्हणाले. (हे ही वाचा:-Congress: महागाई विरोधात कॉंग्रेसचा एल्गार, दिल्लीतील रामलीला मैदानावर रॅली काढत भाजप सरकार विरुध्द हल्लाबोल)
आझाद स्वतचा नवा पक्ष सुरु करण्याची जाहीर घोषणा अखेर त्यांनी या सभेत केली. सोबतच मी अद्याप माझ्या पक्षाचे नाव निश्चित केलेले नाही. जम्मू-काश्मीरमधील जनता माझ्या पक्षाचे नाव आणि झेंडा ठरवतील. तसेच मी माझ्या पक्षाला एक हिंदुस्थानी नाव देईल असं गुलाम नबी आझाद यांनी आपल्या संबोधनातून जाहीर केलं आहे.