काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड
आज काँग्रेसच्या पार पडलेल्या कार्यकारणी समितीच्या बैठकी दरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे.
काँग्रेस (Congress) पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची निवड करण्यात आली आहे. आज काँग्रेसच्या पार पडलेल्या कार्यकारणी समितीच्या बैठकी दरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे. नेत्यांनी सोनिया गांधी ( यांनी अध्यक्षपदी असण्याची मागणी केल्यानंतर या पदाचा कारभार स्विकारला आहे. तसेच काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेता गुलाम नबी आजाड यांनी सोनिया गांधी नव्या अध्यक्ष झाल्याची घोषणा केली आहे.
आज रात्री 8 वाजल्यापासून काँग्रेस पक्षाची बैठक सुरु झाली होती. त्यामध्ये सोनिया गांधी, महासचिव प्रियंका गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, ज्योतिरादित्य सिंधिया आणि अन्य बड्या नेत्यांची उपस्थिती लावली होती. मात्र बैठक सुरु झाली तरीही राहुल गांधी आले नसल्याने त्यांच्यासाठी सर्वजण वाट पाहत होते. मात्र अखेर सर्वांच्या सांगण्यावरु राहुल गांधी यांनी बैठकीला उपस्थिती लावली.
या बैठकीवेळी राहुल गांधी यांनी जम्मू-कश्मीरची परिस्थिती खराब असल्याचे म्हटले. तसेच सरकारला जम्मू-कश्मीरमधील परिस्थितीवरुन सांगत काय चुकीचे घडत आहे हे सांगणे महत्वाचे असल्याचे विधान केले. तसेच सकाळी पार पडलेल्या कार्यकारणी समिती बैठकीत नेत्यांचे पाच समूह बनवण्यात आले. त्यामध्ये देशभरातील नेत्यांची मत मांडण्यात आली. त्यानंरच रात्री पार पडलेल्या बैठकीत या नेत्यांच्या मतांचा रिपोर्ट सादर करण्यात आला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व नेत्यांनी राहुल गांधी यांनी अध्यक्षपदावर कायम रहावे अशी मागणी केली होती.