Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीतील महाराष्ट्र सदनात दाखल, मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सदनाची विशेष सजावट
CM Eknath Shinde (Photo Credit - Twitter)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कालपासून दिल्ली (Delhi) दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) काल  (Delhi) देशाचे  गृहमंत्री अमित शाहांची (Amit Shah) यांची भेट घेतली. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Modi), राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovid), उपराष्ट्रपती व्यंकया नायडू , जे पी नड्डा (J P Nadda), सह रक्षा मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या भेटी घेणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) ही या सर्व भेटीं दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत उपस्थित असतील.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता दिल्लीतील महाराष्ट्र सदनात दाखल झाले आहेत. 2019 नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिल्यांदाचं दिल्लीतील महाराष्ट्र सदनात (Maharashtra Sadan) दाखल झाले आहेत. तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सदनाची विशेष सजावट करण्यात आली आहे. आज सकाळी सदनातील छत्रपती शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) नतमस्तक होत मुख्यमंत्र्यांनी भेटीगाठींना सुरुवात केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. (हे ही वाचा:-Eknath Shinde on Uddhav Thackeray : आमचा न्यायपालिकेवर पुर्ण विश्वास : एकनाथ शिंदे)

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या दौऱ्यात तसेच भेटीगाठी दरम्यान मंत्रिमंडळ (Cabinet) विस्ताराबाबत चर्चा होणार असल्याचं बोल्या जात आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या एका विशिष्ट गटाचं नेतृत्व करत असले तरीही सर्व महत्त्वाच्या निर्णयासाठी त्यांना मोदी-शाह यांच्यावरच अवलंबून राहावं लागणार असल्याचं यानुसार अधोरेखित झालं आहे. नवीन सरकारमध्ये मंत्री आणि त्यांची खाती कोणती असतील याबाबत मोदी-शाह यांची एकनाथ शिंदेंसोबत चर्चा होणार आहे.  शिंदे सरकारमध्ये एकूण 54 मंत्री असू शकतात. यामध्ये भाजपच्या कोट्यातील 25 आणि शिंदे गटातील 13 आमदारांना मंत्री केले जाऊ शकते.