IPL Auction 2025 Live

Chhattisgarh Assembly Elections Results 2018: छत्तीसगडमध्ये काँग्रेसने पार केला बहुमताचा आकडा; पाहा अपडेट्स

छत्तीसगड विधानसभा निवडणूकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (मंगळवार, 11 डिसेंबर) होत आहे.

मतदान | प्रतिकात्मक फोटो |(Photo by Imtiyaz Shaikh/Anadolu Agency/Getty Images)

Chhattisgarh Assembly Elections Results 2018 in Marathi: छत्तीसगड (Chhattisgarh) विधानसभा निवडणूकीसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीला आज (मंगळवार, 11 डिसेंबर) सुरुवात झाली असून प्राथमिक अंदाज हाती येऊ लागले आहेत. छत्तीसगडमध्ये एकूण 90 जागांसाठी मतदान झाले होते. छत्तीसगडमध्ये काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. मुख्यमंत्री रमणसिंग पिछाडीवर असून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

दरम्यान  मध्य प्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान (Rajasthan), तेलंगणा (Telangana),  मिझोराम (Mizoram ) या राज्यंसाठी पार पडलेल्या विधानसभा निवडणुक (Assembly Elections) मतदान मोजणीला सुरूवात झाली आहे.

छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये 76.39 % मतदान झाले होते. दुसऱ्या टप्प्यातील मतदानामध्ये 76.34 % मतदान झाले. हे मतदान 72 जागांसाठी झाले. राज्यातील 90 सदस्यीय विधानसभेसाठी 38 जागांवर 80 % हून अधिक मतदान झाले आहे. कुरुद विधानसभा जागेवर सर्वाधिक 88.99 % मतदान झाले आहे. तर सर्वात कमी मतदान रायपूर उत्तर या जागेवर 60.03% झाले आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा 1.05% मतदान कमी झाले आहे.  Chhattisgarh Assembly Elections 2018 Exit Poll: छत्तीसगढमध्ये India TV च्या सर्वेनुसार चौथ्यांदा भाजपचे सरकार येण्याची शक्यता