BJP On Opposition Leaders' Meeting: पाटण्यातील विरोधकांच्या संयुक्त बैठकीवर पहा भाजपाची प्रतिक्रिया काय? देवेंद्र फडणवीस ते नितिन गडकरी म्हणतात...!

बिहार मध्ये आज नितिश कुमार यांच्या निवासस्थानी 15 विरोधी पक्षांतील नेत्यांनी बैठकीला हजेरी लावली आहे.

Opposition Party Leaders | Twitter/ANI

2024 च्या लोकसभा निवडणूकांसाठी रणनिती आखण्याकरिता तसेच भाजपा विरोधी ठाम भूमिका घेण्यासाठी आज बिहार (Bihar)  च्या पाटण्यामध्ये (Patna) विरोधक एकत्र जमले आहे. देशभरातून 15 पक्ष एकत्र बैठकीला हजर आहे. राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, स्टॅलिन यांची या सभेला उपस्थिती आहे. दरम्यान यावर आता भाजपा कडूनही प्रतिक्रिया समोर आल्या आहे.

भाजपाकडून विरोधकांच्या या बैठकीवर टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्र भापजा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाटण्यातील या बैठकीवर टीका करताना घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा काढला आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी पाटण्यातील विरोधकांची आजची बैठक ही 'परिवार वाचवण्यासाठी' असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील आज या बैठकीवर भाष्य केलं आहे. त्यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये 2019 च्या तुलनेत अधिक यश भाजपा मिळवणार असल्याचा विश्वास बोलून दाखवला आहे. Sharad Pawar विरोधकांचा चेहरा होणार? पहा  नितीश कुमार, शरद पवार यांनी जाहीरपणे यावर दिलेलं उत्तर! (Watch Video) .

पाटण्यामध्ये आज राहुल गांधी, शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत, आदित्य ठाकरे, लालूप्रसाद यादव- तेजस्वी यादव पोहचल्याचं पहायला मिळालं आहे. काही दिवसांपूर्वी नितिश कुमार यांनी स्वतः देशभर फिरून प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली होती. आजची बैठक नितिश कुमार यांच्या निवासस्थानी संपन्न होत आहे.

जेपी नड्डा यांची प्रतिक्रिया

 

ज्या मेहबुबा मुफ्ती सईद यांच्यासोबत सत्ता स्थापन केली म्हणून तुम्ही भाजपाला टोमणे मारता, त्या सईद यांच्यासोबत तुम्ही बसणार आहात का? दुसऱ्यांनी केली की ती गद्दारी आणि तुम्ही केलं की ती देशभक्ती अशी दुहेरी भूमिका कशी काय असू शकते? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. 'ज्या मेहबुबा मुफ्ती यांनी कलम 370ला विरोध केला. त्यांच्यासोबत तुम्ही सत्तेसाठी मदत घेणार आहात का? असं संदीप देशपांडेंनी विचारलं आहे.