Bihar Election Results 2020: RJD नेता तेजप्रताप यादव हासनपूर मतदार संघातून विजयी

त्यांनी हासनपूर मतदार संघातून जेडीयूच्या राज कुमार राय यांचा पराभव केला आहे.

Tej Pratap Yadav | (Photo Credits: Facebook)

बिहार मध्ये आता जसजशी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होत आहे तसे निकाल स्पष्ट होण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान आता या निकालांमध्ये पुन्हा चुरस देखील वाढली आहे. दरम्यान लालूप्रसाद यादव(Lalu Prasad Yadav) यांच्याशिवाय पहिल्यांदाच विधानसभा निवडणूकीमध्ये उतरलेले राजद पक्ष कार्यकर्त्यांसाठी आता पहिली मोठी खूषखबर समोर आली आहे. दरम्यान लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजप्रताप यादव (RJD leader Tej Pratap Yadav)

हे विजयी ठरले आहेत. त्यांनी हासनपूर मतदार संघातून जेडीयूच्या राज कुमार राय यांचा पराभव केला आहे.

आज सकाळपासून तेजप्रताप आघाडीवर होते. मध्यंतरी काही फेर्‍यांमध्ये ते मागे पडले होते मात्र जशी मतमोजणी पूर्ण झाली तशी त्यांनी पुन्हा मुसंडी मारली आणि आपला विजय नोंदवला आहे. दरम्यान त्यांच्याकडे 20 हजारांपेक्षा अधिकचे मताधिक्य होते. 2015 च्या निवडणूकीमध्ये तेजप्रताप महुआ मतदारसंघातून लढले होते मात्र आता ते तुलनेत सुरक्षित हासनपूर मतदार संघातून लढले. याठिकाणी यादव आणि मुस्लिम मतदार यांचं वर्चस्व असल्याचं सांगितलं जातं.

ANI Tweet

तेजप्रताप यांचे सासरे चंद्रिका यांचा पराभूत  झाला असून बंधू तेजस्वी यादव आघाडीवर आहेत. तेजस्वी राघोपूर मतदार संघातून आघाडीवर आहेत. सध्या एनडीए 124 आणि आरजेडी 111 जागांवर आघाडीवर आहे. तर बिहार मध्ये पक्षीय बलाबल पाहता आरजेडीकडे सर्वाधिक जागा आहेत.