Bihar Assembly Election 2020: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'महागठबंधन' जागावाटपाच्या अंतिम टप्प्यात, 'राजद' मोठ्या भावाच्या भूमिकेत, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर
राष्ट्रीय जनता दल 135-140 जागांवर उमेदवार उतरवेन. काँग्रेसच्या वाट्याला 50 ते 55 जागा येतील. तर याशिवाय रालोसपाच्या वाट्याला 15 ते 20 आणि विकासशील इन्सान पक्षासाठी 10 किंवा त्यापेक्षाही कमी जागा येतील. याशिवाय डाव्या पक्षांना जागावाटपामध्ये सामंजस्याने तोडगा काढत जागावाटपवावर चर्चा होणार असल्याचे समजते.
लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या राष्ट्रीय जनता दल (Rashtriya Janata Dal) नेतृत्वाखाली महागठबंधनने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपांचे सूत्र निश्चित केले आहे. महागठबंधन आणि राजदमधील अनेक नेते रांची येथे जाऊन राजद (Rashtriya Janata Dal) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची भेट घेत आहे. दरम्यान, सूत्रांच्या हवावल्याने वृत्त देताना प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, महागठबंधनने जागावाटपाचे सूत्रही निश्चित केले आहे. हे सूत्र अद्याप जाहीर झाले नाही. मात्र, राष्ट्रीय जनता दल मोठ्या भावाच्या भूमिकेत तर काँग्रेस पक्ष (Indian National Congress) दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे समजते.
सूत्रांच्या हवाल्याने वृत्तसंस्था आयएनएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, बिहारमध्ये महागठबंधन(Mahagathbandhan) मध्ये राष्ट्रीय जनता दल हा मोठ्या भावाच्या भूमिकेत असणार आहे. तर दुसऱ्या क्रमांकाचा भाऊ म्हणून काँग्रेस असणार आहे. सूत्रांनी म्हटले आहे की, महागठबंधनमध्ये सहभागी असलेल्या घटक पक्षांना जागावाटपाचे सूत्र जवळपास मान्य आहे. डाव्या पक्षांनंतर राष्ट्रीय लोकसमता पार्टी (रालोसपा) च्या वतीन जागावाटपावर चर्चा करण्यासाठी पक्षाचे उपाध्यक्ष राजेश यादव आणि प्रदेश कार्यकारी अध्यक्ष वीरेद्र कुशवाहा यांनी राजदचे प्रदेश अध्यक्ष जगदानंद सिंह यांच्याशी बुधवारी चर्चा केली. या आधी डाव्या पक्षाच्या नेत्यांनीही जगदानंद सिंह यांच्याशी एकत्र चर्चा केली.
कसा असेल महागठबंधनचा जागावाटपाचा फॉर्म्यूला?
सूत्रांच्या हवाल्यनाे दिल्या वृत्तात, वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, राष्ट्रीय जनता दल 135-140 जागांवर उमेदवार उतरवेन. काँग्रेसच्या वाट्याला 50 ते 55 जागा येतील. तर याशिवाय रालोसपाच्या वाट्याला 15 ते 20 आणि विकासशील इन्सान पक्षासाठी 10 किंवा त्यापेक्षाही कमी जागा येतील. याशिवाय डाव्या पक्षांना जागावाटपामध्ये सामंजस्याने तोडगा काढत जागावाटपवावर चर्चा होणार असल्याचे समजते. (हेही वाचा, Bihar Assembly Election 2020: 'हम' करणार नितीश कुमार यांच्या पक्षाशी आघाडी- जीतन राम मांझी)
दरम्यान, सुत्रांनी पुढे असेही म्हटले आहे की, या जागावापटापात इच्छुकांची आणि महागठबंधनमधील पक्षांची नाराजी मोठ्या प्रमाणावर पुढे येऊ शकते. काँग्रेसने तर सुरुवातीपासूनच 80 ते 70 जागांचा आग्रह धरला आहे.
दुसऱ्या बाजालू काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि काँग्रेस निवड समितीचे प्रमुख अखिलेश सिंह यांनी बुधवारी रांची येथे जाऊन लालू प्रसाद यादव यांच्याशी चर्चा केली दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील अद्याप बाहेर आला नाही. दरम्यान, या वेळी काँग्रेसची नजर त्या जागांवरही आहे. ज्या जागांवर मागच्या वेळी संयुक्त जनता दलाचा उमेदवार विजयी झाला आहे आणि काँग्रेस उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. सुत्रांनी म्हटले आहे की, महागठबंधन बहुजन समाज पार्टी आणि झारखंड मुक्ती मोर्चा यांसारख्या इतर एकदोन पक्षांनाही जागा सोडली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी जागावाटपाच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर दिले नाही. मात्र, त्यांनी इतके नक्कीच सांगितले की, महागठबंधन जागावाटपावर चर्चा करत आहे. सर्व घटक पक्ष मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहेत. महागठबंधनमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नाही. योग्य वेळी प्रसारमाध्यमांना सर्व माहिती दिली जाईल, असेही मृत्यूंजय तिवारी यांनी सांगितले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)