अमित शहा यांच्या हस्ते पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भूमीपुजन, आंबेडकरांच्या पुतळ्याचे केले अनावरण
शिवाजी महाराजांनी न्याय, सामाजिक कल्याण आणि स्वसंरक्षणासाठी रणनीती आखणे, लष्कराची उभारणी करणे, लष्कराचे आधुनिकीकरण करणे आणि 18व्या शतकातील पहिले नौदल उभारण्याचे काम केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या हस्ते रविवारी पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन झाले. यावेळी अमित शहा म्हणाले की, ज्या वेळी 'स्वराज्य' हा शब्द उच्चारला तरी भीती निर्माण होते, त्या काळात शिवाजी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य देशात 'हिंदवी स्वराज्य' स्थापन करण्यासाठी समर्पित केले. कार्यक्रमात गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, शिवाजी महाराजांनी न्याय, सामाजिक कल्याण आणि स्वसंरक्षणासाठी रणनीती आखणे, लष्कराची उभारणी करणे, लष्कराचे आधुनिकीकरण करणे आणि 18व्या शतकातील पहिले नौदल उभारण्याचे काम केले. अमित शाह म्हणाले की, यूपीमध्ये पूर्वी मुलायम सिंह, अखिलेश सिंह आणि बहिण मायावतीजी आम्हाला टोमणे मारायचे, तिथे मंदिर बांधण्याची तारीख सांगणार नाही. आज मी सर्वांना सांगू इच्छितो की मोदीजींनी अयोध्येत मंदिराचे भूमिपूजन केले आहे आणि काही महिन्यांत भव्य राम मंदिर बांधले जाणार आहे.
Tweet
पुण्यातील समारंभाला संबोधित करताना अमित शहा म्हणाले की, आगामी काळात भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सची करण्याच्या ध्येयामध्ये सहकार विभाग आणि सहकार चळवळीचा मोठा हात असेल. यावेळी त्यांनी लवकरच सहकार प्रशिक्षणासाठी अभ्यासक्रमांसह विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. देशाच्या विविध भागात या विद्यापीठाची महाविद्यालये असतील, ज्यामध्ये सहकारी प्रशिक्षण दिले जाईल.
आज आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरणही करण्यात आले, असेही अमित शहा म्हणाले
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर अपमान, अन्याय, कटुता सहन केली. परंतु, त्यांनी संविधान तयार करताना कुठेही कटुता येऊ दिली नाही. बाबासाहेबांना त्यांच्या आयुष्यात आणि मृत्युनंतर देखील अपमानित करण्याची कॉंग्रेसनं एकही संधी सोडली नाही. त्यांना भारतरत्न हा बिगर काँग्रेसी राजवटीतच मिळाला. पंतप्रधान मोदी सत्तेवर आले आणि त्यांनी संविधान दिन साजरा केला, पण काँग्रेसने त्यावर बहिष्कार टाकला.