Assembly Elections 2023: मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाची विधानसभा निवडणुकींचा आज वाजणार बिगुल

केसीआरच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समिती तेलंगणात सत्तेवर आहे आणि मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) मिझोराममध्ये सत्तेत आहे.

Election Commission of India | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

मध्यप्रदेश (Madhya Pradesh), छत्तीसगड (Chhattisgarh), राजस्थान (Rajasthan), मिझोरम (Mizoram) आणि तेलंगणाची (Telangana) विधानसभा निवडणुकीचा (Assembly Elections) आज (9 ऑक्टोबर) बिगुल वाजणार आहे. निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेत या पाच राज्यातील निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. दुपारी 12 वाजता दिल्लीत या निवडणूकींबाबत निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन माहिती घेणार आहे.

देशातील आगामी लोकसभा निवडणूकांपूर्वी 5 राज्यात होणारी विधानसभा निवडणूक ही एनडीए आणि इंडिया या दोन महत्त्वाच्या गटांसोबतच सार्‍याच पक्षांसाठी लिटमस टेस्ट असणार आहे. या पाच राज्यांतील विधानसभांची मुदत डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 दरम्यान संपणार आहे. ECI सामान्यत: विधानसभेची मुदत संपण्याच्या सहा ते आठ आठवडे आधी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करते.

पहा ट्वीट

राजस्थान आणि छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, तर मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आहे. केसीआरच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समिती तेलंगणात सत्तेवर आहे आणि मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) मिझोराममध्ये सत्तेत आहे.

पाचही राज्यात एका टप्प्यात मतदान घेण्याचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान आज निवडणूक तारखा जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू होईल. पुढे मतदानाची प्रक्रिया असेल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif