Arvind Kejriwal Swearing-In Ceremony: अरविंद केजरीवाल आज घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ; संपूर्ण कार्यक्रमाचे वेळापत्रक, वाहतूक मार्ग आणि पोलीस बंदोबस्त याविषयी घ्या जाणून

या मंत्र्यांमध्ये उनमें मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गहलोत, इमरान हुसैन आणि राजेंद्र गौतम यांचा समावेश आहे.

Arvind Kejriwa | (Photo Credit: Twitter)

आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आज (रविवार, 16 फेब्रुवारी 2019) दिल्ली येथील रामलीला (Ramlila Maidan) मैदानावर दिल्लीचे मुख्यमंत्री (CM Of Delhi) म्हणून शपथ घेणार आहेत. दिल्लीच्या माजी मुख्यंमंत्री आणि काँग्रेस नेत्या दिवंगत शीला दीक्षित (Sheila Dikshit) यांच्यानंतर अरविंद केजरवाल हे पहिलेच मुख्यमंत्री आहेत जे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळात असलेले इतर 6 मंत्रीही आपले पद आणि गोपनियतेची शपथ घेतील. या मंत्र्यांमध्ये उनमें मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गहलोत, इमरान हुसैन आणि राजेंद्र गौतम यांचा समावेश आहे. केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्याला विविध क्षेत्रातील अनेक लोक उपस्थित राहणार आहेत. यात डॉक्टर, टीचर्स, बाइक ऐम्बुलेंस राइडर्स, सफाई कर्मचारी, कंस्ट्रक्शन वर्कर्स, बस मार्शल, ऑटो ड्राइवर यांचाही समावेश आहे.

अरविंद केजरीवाल शपथविधी सोहळा कार्यक्रम वेळापत्रक

एएनआय ट्विट

वाहतूक व्यवस्थेसाठी विशेष तयारी

रामलीला मैदानात शपथ ग्रहण कार्यक्रमाला डोळ्यासमोर ठेऊन प्रशासनाने वाहतूकीची विशेष व्यवस्था केली आहे. अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, शपथविधी सोहळा ध्यानात घेऊन सकाळी 10 वाजलेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत रामलीला मैदानात वाहतुकमार्गातील बदल लाहू राहतील. त्यामुळे नागरिकांनी हे बदल ध्यानात घेऊन वाहने हाकावीत. (हेही वाचा, दिल्ली: अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्याला बेबी मफलरमॅनला आमंत्रण)

एएनआय ट्विट

चोख सुरक्षा व्यवस्था

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शपथवीधी सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त करण्यात आला असून, दिल्ली पोलीस, सीआरपीएफ यांच्यासह निमलष्करी दलाचे सुमारे 2,000 ते 3,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच, या सोहळ्यावर आकाशातून नजर ठेवण्यासाठी विशेष ड्रोनचा वापरही केला जाणार आहे. तसेच, सर्व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंना या कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी मान्यता असेन. सुरक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली असून, प्रवेशद्वारांवर 'मेटल डिटेक्टर' यंत्रणारी कार्यन्वीत केली आहे.

दरम्यान, एकूण 70 जागांसाठी घेण्यात आलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला मिळालेले हे यश प्रचंड मोठे आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला 62 तर त्यांच्या विरोधात आक्रमक प्रचार केलेल्या भाजपला केवळ 08 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला तर या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. काँग्रेसला दिल्ली विधानसभा निवडणुकीत शून्य जागा मिळण्याची ही दुसरी वेळ आहे.