West Bengal: अमित शाह,भाजपच्या गुंडांकडूनच पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार: तृणमूल काँग्रेस
कोलकाता येथे अमित शाह यांच्या रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर राजकारण चांगलेच तापले असून, राजधानी दिल्ली ते देशातील विविध राज्यांतूनही तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना आदींनी या हल्ल्याचा निशेध केला आहे. येत्या 19 मे रोजी पश्चिम बंगाल राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्यातील मतदान पार पडणार आहे.
Lok Sabha elections 2019: भाजप अध्यक्ष अमित शाह (Amit Shah) हे पश्चिम बंगाल (West Bengal) राज्यात बाहेरुन गुंड घेऊन आले. त्यांनीच रॅलीदरम्यान हिंसाचार केला, असा पलटवार तृणमूल काँग्रेसने केला आहे. कोलकाता येथे लोकसभा निवडणूक 2019 प्रचारादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन तृणमूल काँग्रेसवर आरोप केला होता. या आरोपानंतर तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन (Derek O Brien) यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर पलटवार केला. या वेळी भाजप नेते तजिंदर सिंह बग्गा यांना अटक करण्यात आली आहे. हे तेच बग्गा आहेत ज्यांनी दिल्ली येथे कोणाला कानाखाली मारली होती, असेह ब्रायन म्हणाले.
तृणमूल नेता डेरेक ओ ब्रायन म्हणाले, अमित शाह यांनी पश्चिम बंगालचा अपमान केला आहे. अमित शाह एक 'घटिया आदमी' आहेत असेही ब्रायन म्हणाले. ओ ब्रायन यांनी ट्विट करुन अमित शाह यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात बंगालची जनता अमित शाह आणि भाजपला चांगलेच प्रत्युत्तर देईन असेही ब्रायन म्हणाले.
दरम्यान, 'काल थोडक्यात वाचलो, माझी हत्याच झाली असती' असे खळबळजनक विधान करत भाजप अध्यक्ष अमित शाह (Amit Shah) यांनी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत अनेक गंभीर आरोप केले आहेत. पश्चिम बंगाल (West Bengal) राज्यात लोकसभा निवडणूक 2019 प्रचार रॅली दरम्यान मंगळवारी (14 एप्रिल 2019) मोठा हिंसाचार भडकला. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेत पश्चिम बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee), पश्चिम बंगाल पोलीस आणि निवडणूक आयोग (Election Commission) यांच्यावर आरोप आणि दाव्यांचे फैरीच झाडल्या आहेत.
पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना अमित शाह म्हणाले, पश्चिम बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणतात की भाजप कार्यकर्त्यांनी हिंसाचार केला. पण, भाजप केवळ पश्चिम बंगाल या वनाच राज्यात नव्हे तर देशभरात निवडणूक लढत आहे. देशातील इतर ठिकाणी हिंसा होत नाही. केवळ पश्चिम बंगालमध्येच कशी काय होते? देशात या आधी सहा टप्प्यांतील मतदानाला भाजप समोरे गेला. मात्र, यातील वनाही ठिकाणी असा हिंसाचार घडला नाही, असेही अमित शाह म्हणाले. (हेही वाचा, 'काल थोडक्यात वाचलो, माझी हत्याच झाली असती', भाजप अध्यक्ष अमित शाह यांचा आरोप)
दरम्यान, या हिंसाचारात ईश्वर चंद्र विद्यासागर यांचा पुतळा तोडण्यात आला. हा पुतळा भाजप कार्यकर्त्यांनी तोडला नाही. ज्या कॉलेजमध्ये हा पुतळा तोडण्याता आला त्या कॉलेजचे फाटक (गेट) बंद होते. तर, मग पुतळा तुटलाच कसा? हा पुतळा तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनीच तोडला असल्याचा आरोप करत हिंसाचारावेळी रॉकेल भरलेल्या बॉटलही फेकण्यात आल्याचे अमित शाह यांनी सांगितले.
दरम्यान, कोलकाता येथे अमित शाह यांच्या रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर राजकारण चांगलेच तापले असून, राजधानी दिल्ली ते देशातील विविध राज्यांतूनही तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना आदींनी या हल्ल्याचा निशेध केला आहे. येत्या 19 मे रोजी पश्चिम बंगाल राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्यातील मतदान पार पडणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 15, 2019 04:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

