अमित शहा यांचे भाजपा अध्यक्ष पद डिसेंबर पर्यंत कायम राहण्याची शक्यता, लोकसभा निकालानंतर आता 'हे' असणार नवं टार्गेट

लोकसभेमधील यशाच्या नंतर आता अधिक राज्यांमध्ये भाजपाचा प्रसार करण्यासोबत विधानसभेची रणनीती आखणे हे पक्षाचे प्रमुख टार्गेट असल्याचे समजत आहे.

Amit Shah | (Photo courtesy: amitshah.co.in)

अमित शहा (Amit Shah)  यांची गृहमंत्री (Home Minister)  म्हणून नेमूणक झाल्यावर आता भाजपा  (BJP) अध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार याविषयी चर्चा होती, मात्र सुत्रांच्या माहितीनुसार निदान डिसेंबर 2019 पर्यंत तरी या पदाची जबाबदारी शहा यांच्याकडेच राहण्याची शक्यता वर्तवली जातेय. यांनतर नव्या वर्षात म्हणजे 2020 मध्ये या पदासाठी दुसऱ्या नावांचा विचार केला जाऊ शकतो. नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा निवडणूक निकालातील अभूतपूर्व यशासाठी पक्षप्रमुख अमित शहा यांची मेहनत व अनुभव मुख्यतः कामी आली होती, त्याच प्रमाणे महाराष्ट्र हरियाणा व झारखंड या राज्यात येत्या काळात विधानसभा निवडणुकांसाठी देखील शहांच्या नेतृत्वाचा उपयोग होईल या उद्देशाने त्यांच्याकडे हे पद कायम ठेवण्याचा विचार केला जात आहे.

अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी 13 जून ला भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींची एक बैठक घेण्यात आली होती, यामध्ये पक्षाच्या प्रसारासाठी सर्व राज्यात निदान 20 टक्के सदस्यत्व वाढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले गेले. 2014 मध्ये हरियाणा व महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक पार पडल्या होत्या. महाराष्ट्रात त्यावेळी शिवसेना भाजपा युती होऊन सरकारची स्थापना करण्यात आली होती. येत्या विधानसभेसाठी देखील या तीन राज्यांमध्ये शहा यांच्या नेतृत्वाखाली रणनीती आखण्यात येईल आणि त्यानंतर सहा महिन्यांच्या आत पक्षांतर्गत निवडणूक घेऊन नव्या अध्यक्षांची नेमणूक करण्यात येईल अशी माहिती बिहार मधील भाजपा नेते भूपेंद्र यादव यांनी दिली आहे. मंत्र्यांनी घरातून काम न करता ऑफिसात सकाळी 9.30 पर्यंत पोहचावे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदेश

लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीही पुन्हा एकदा सरकारची स्थापना करण्यात आली आहे. विरोधी पक्षांचा दमदार प्रचार असताना देखील बीजेपीने पश्चिम बंगाल मध्ये चांगली कामगिरी केली होती. मात्र तामिळनाडू , केरळ आणि आंध्रप्रदेश मध्ये पक्षाला एकही जागा मिळाली नव्हती त्यामुळे येत्या काळात ही दाक्षिणात्य राज्यात प्रसार करणे प्रमुख टार्गेट असणार असल्याचे दिसत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif