Ajay Barsakar on Manoj Jarange Patil : वाशीत आदल्या दिवशी मटन खाल्लं, दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडलं; अजय बारसकर यांचा जरांगेंवर आणखी एक आरोप

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडण्याआधी जरांगे यांनी आदल्या दिवशी मटन खाल्ले असा आरोप बारसकर यांनी केला आहे.

Photo Credit - Twitter

Ajay Barsakar on Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange Patil)एकीकडे सरकारला धारेवर धरत आहेत. तर, दुसरीकडे त्यांचेच एकेकाळचे सहकारी त्यांच्या विरोधात वक्तव्य करत आहेत. जरांगे पाटील यांच्यावर अजय बारसकर (Ajay Barsakar)यांनी आता नवे आरोप केले आहेत. वाशीमध्ये ज्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडलं, त्याच्या आदल्या दिवशी जरांगे यांनी मटण खाल्लं. एवढंच नाही तर, देवेंद्र फडणवीस यांच्या घरी ज्यावेळी यायला निघाले, त्यावेळी रात्री जेवण केलं’ असा आरोप अजय बारसकर यांनी केला आहे. मनोज जारांगे यांची लढाई गोरगरीब मराठ्यांसाठी नव्हती. ज्यांना ओबीसीच्या कोट्यातून सरपंच व्हायच होत. त्यांच्यासाठी जरांगे यांची ही लढाई होती, असे आरोप बारसकर यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांच्यावर केले.(हेही वाचा :Case Filed Against Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्याविरूद्ध बीड मध्ये गुन्हा दाखल)

पत्रकार परिषदेत, बारसकर पुढे म्हणाले की, मनोज जरांगेनी आरक्षणाचं आंदोलन निवडणुकीपर्यंत भरकटवल यासाठी ही पत्रकार परिषद आहे. मी एक महिना शांत होतो कारण, काहींनी मला एक महिना शांत रहून जरांगे काय करतात हे पहायला सांगितलं होतं. मात्र, महिनाभरात काहीच झालं नाही. जरांगे यांच्यावर विश्वास होता म्हणून त्यांना एवढा मोठा पाठिंबा मिळाला, पण आता अश्या काही घटना घडल्या ज्याने त्यांची विश्वासार्हता कमी झाली आहे. बारसकर यांनी लोणावळ्यातील बंद दाराआडच्या चर्चांवर भाष्य करत प्रश्न उपस्थित केले. त्याशिवाय, अशोक चव्हाण हे परवा रात्री तिकडे गेले, जरांगे यांना भेटले आणि माध्यमांना प्रतिक्रियाही दिली. मग, अशोक चव्हाण यांच्या भेटीवेळी काय चर्चा झाली त्याच रेकॉर्डिंग जगासमोर आणा, असं बारसकर म्हणाले.(हेही वाचा :Manoj Jarange Patil SIT Enquiry: मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाची एसआयटी चौकशी; राज्य सरकारचा निर्णय)

मनोज जरांगे यांची लढाई गोरगरिब मराठ्यांसाठी नव्हती. त्यांनी ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावली. एकेक मराठा अपक्ष उमेदवार उभा करण्याची पहिली डील झाली आणि आता मविआसोबत दुसरी डील सुरु आहे, जिथे त्यांचा उमेदवार असेल तिथे हे उमेदवार उभा करणार नाहीत ही त्यांची दुसरी डील आहे, असा आरोप बारसकर यांनी केला आहे. दहावी बारावी छाप, पास झाला की नापास माहित नाही पण याने कसलही ज्ञान नसताना सगळ्यांना भरकटवलं. लोकसभेत आपलं काही गुंतल नाही. आरक्षण जे मिळणार आहे ते राज्यात मिळणार आहे अस ते म्हणाले.. खरच अस आहे का ? लोकसभेचा काहीच फायदा नाही का ? किती मराठ्यांना फायदा झाला हे जरांगेने सांगावं. वाशीम जिल्ह्यातली एक भगिनी आहे. तिला नायब तहसीलदार झाली होती पण कुणबी प्रमाणपत्रामुळे ती कलेक्टर झाली अस भ्रामक विधान त्याने कालच्या सभेत केलं. हे खोट असल्याचंही बारसकर यांनी म्हटलं आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif