Surat Diamond Bourse: PM मोदी आज करणार जगातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट 'सुरत डायमंड बोर्स' कार्यालयाचे उद्घाटन, See Photos

अंदाजे 3,500 कोटी रुपये खर्चून बांधलेली ही इमारत 67 लाख स्क्वेअर फूट फ्लोअर स्पेसमध्ये पसरलेली आहे. तसेच यात जवळपास 4,500 डायमंड ट्रेडिंग कार्यालये ठेवण्याची क्षमता आहे.

Surat Diamond Bourse, PM Modi (PC - Facebook, Twitter)

Surat Diamond Bourse: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज नव्याने विकसित झालेल्या सुरत डायमंड बोर्सचे (Surat Diamond Bourse) उद्घाटन करण्यासाठी गुजरातच्या सुरत (Surat) जिल्ह्याला भेट देणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) सांगितले की, उद्घाटनानंतर, सुरत डायमंड बोर्स हे आंतरराष्ट्रीय हिरे आणि दागिन्यांच्या व्यवसायासाठी जगातील सर्वात मोठे आणि आधुनिक केंद्र असेल. हे रफ आणि पॉलिश्ड हिरे तसेच दागिन्यांच्या व्यापारासाठी जागतिक केंद्र असेल. यामध्ये आयात आणि निर्यातीसाठी अत्याधुनिक 'कस्टम क्लिअरन्स हाऊस', किरकोळ दागिन्यांच्या व्यवसायासाठी ज्वेलरी मॉल आणि आंतरराष्ट्रीय बँकिंग आणि सुरक्षित तिजोरीसाठी सुविधा असेल.

दरम्यान, शनिवारी पीएम मोदींनी X वर एका पोस्टमध्ये उद्घाटन समारंभाची माहिती शेअर करताना सांगितलं आहे की, उद्या सुरतमध्ये, सूरत डायमंड बाजाराचे उद्घाटन होणार आहे. यामुळे हिरे उद्योगाला मोठी चालना मिळेल. 'कस्टम क्लिअरन्स हाउस' , ज्वेलरी मॉल आणि इंटरनॅशनल बँकिंग आणि सेफ व्हॉल्ट्सची सुविधा हे बोर्सचे महत्त्वपूर्ण भाग असतील. (हेही वाचा - Quality of Living City Index: ‘क्वालिटी ऑफ लिव्हिंग’च्या बाबतीत देशात पुणे ठरले दुसरे सर्वोत्तम शहर; Mercer ने जारी केली यादी, घ्या जाणून)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डायमंड बोर्सचे फोटोही शेअर केले आहेत. अंदाजे 3,500 कोटी रुपये खर्चून बांधलेली ही इमारत 67 लाख स्क्वेअर फूट फ्लोअर स्पेसमध्ये पसरलेली आहे. तसेच यात जवळपास 4,500 डायमंड ट्रेडिंग कार्यालये ठेवण्याची क्षमता आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये, डायमंड रिसर्च अँड मर्कंटाइल (DREAM) सिटीचा भाग असलेल्या या इमारतीला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने जगातील सर्वात मोठी कार्यालयीन इमारत म्हणून मान्यता दिली.

तथापी, 35.54 एकर जागेवर बांधलेल्या या मेगास्ट्रक्चरमध्ये नऊ ग्राउंड टॉवर्स आहेत. ऑफिस स्पेस 300 स्क्वेअर फूट ते 1 लाख स्क्वेअर फूट आहे. नऊ आयताकृती टॉवर मध्यवर्ती जोडलेले आहेत. या इमारतीला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (IGBC) कडून प्लॅटिनम मानांकन आहे. किरण जेम्सचे संचालक अब्जाधीश हिरे व्यापारी वल्लभभाई लखानी यांनी त्यांचा रु. 17,000 कोटींचा व्यवसाय डायमंड बोर्समध्ये हलविला आहे. ते त्यांच्या कर्मचार्‍यांना राहण्यासाठी एक मिनी-टाउनशिप देखील विकसित करत आहे.  (हेही वाचा: Most Expensive City in India for Expats: मुंबई ठरले स्थलांतरीत लोकांसाठी देशातील सर्वात महागडे शहर; वर्षभरात घरभाड्यात झाली 15-20 टक्के वाढ)

कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर, पंतप्रधान मोदी अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी त्यांच्या लोकसभा मतदारसंघ वाराणसीला जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी साडेअकराच्या सुमारास सुरत विमानतळावरील नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करतील. टर्मिनल बिल्डिंग हे सुरत शहराचे प्रवेशद्वार आहे, त्यामुळे तिची रचना स्थानिक संस्कृती आणि वारसा लक्षात घेऊन केली गेली आहे, जेणेकरून अभ्यागतांना अंतर्गत आणि बाह्य संस्कृती आणि स्थानिक खुणा या दोन्हींचे प्रतिबिंब दिसेल. अत्याधुनिक टर्मिनल इमारतीचा दर्शनी भाग प्रवाशांना सुरत शहरातील 'रांदेर' भागातील जुन्या घरांच्या समृद्ध आणि पारंपारिक लाकडीकामाचा समृद्ध अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आला आहे.