IPL Auction 2025 Live

Lata Mangeshkar Birth Anniversary: लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी वाहिली आदरांजली; आठवणींचा लेखही केला शेअर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लता मंगेशकर यांना त्यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.

Photo Credit- X

Lata Mangeshkar Birth Anniversary: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना त्यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या 'विशेष सहवासाची' आठवण सर्वासोबत शेअर केली. पंतप्रधान मोदीं(PM Modi)नी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'लता दीदी तिच्या सुरेल गाण्यांमुळे लोकांच्या हृदयात आणि मनात कायम जिवंत राहील्या आहेत.'

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, 'लता दीदींसोबत माझे विशेष संबंध होते. त्यांचे स्नेह आणि आशीर्वाद घेण्याचे भाग्य मला लाभले.' पंतप्रधानांनी लता मंगेशकर यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी 'इंडियन एक्स्प्रेस'मध्ये लिहिलेला लेखही शेअर केला. ज्यामध्ये मोदी आणि लता दीदी यांच्यातील संबंधांचा उल्लेख आहे. (हेही वाचा:Ram Aayenge In Lata Mangeshkar AI Voice: लता मंगेशकर यांच्या एएल जनरेट केलेल्या आवाजातील 'राम आयेंगे' गाणं व्हायरल; नेटिझन्स म्हणाले, 'Ultra Melodious' )

 लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी वाहिली आदरांजली

पंतप्रधानांच्या दूरदृष्टीने लता मंगेशकर खूप प्रभावित झाल्या होत्या. लतादीदी अनेक वेळा पंतप्रधान मोदींसोबत दिसल्या होत्या. देशाच्या या दोन महान व्यक्तींमध्ये आदराचे आणि स्नेहाचे अतूट नाते होते. अनेक दशके पार्श्वगायनात अव्वल स्थानावर राहिलेल्या लता मंगेशकर यांनी शास्त्रीय संगीताच्या बारकाव्यावर प्रभुत्व मिळवले होते. लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूरमध्ये झाला. 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.