Today Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेलचे दर अद्याप स्थिर, निवडणूकीच्या निकालानंतर दरवाढ होण्याची शक्यता
तर पुण्यात पेट्रोल 109.52 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.31 रुपये प्रतिलिटर आहे.
सरकारी तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Rate) जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे गेल्या चार महिन्यांपासून तेलाच्या किमतीत कोणताही मोठा बदल झालेला नाही. महाराष्ट्र राज्याबद्दल बोलायचे झाले तर, आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच, किंमत स्थिर आहे. महाराष्ट्राचा समावेश अशा राज्यांच्या यादीत आहे जेथे अनेक दिवसांपासून 100 रुपयांच्या वर पेट्रोल विकले जात आहे. पुणे ते नाशिक, मुंबईसह राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये आज इंधनाचे दर काय आहेत ते जाणून घेऊया. मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर आहे. तर पुण्यात पेट्रोल 109.52 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.31 रुपये प्रतिलिटर आहे.
वास्तविक, अहवालानुसार इंधनाच्या किमती वाढणार आहेत. विशेष म्हणजे, देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत असून त्यात उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबचा समावेश आहे. अशा स्थितीत पुढील आठवड्यात निवडणुका संपल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. निवडणूक संपताच तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करू शकतात. हेही वाचा Russia-Ukraine War: ममता बॅनर्जींनी पंतप्रधानांवर केला मोठा आरोप, म्हणाल्या- 'युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थाना घेवुन येण्यास सरकराचा निष्काळजीपणा
आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $100 च्या वर गेली आहे. अशा परिस्थितीत तेल कंपन्यांना सामान्य मार्जिन मिळविण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 9 रुपयांनी वाढ करणे आवश्यक आहे. त्याच वेळी, PPAC नुसार, भारताने खरेदी केलेल्या कच्च्या तेलाची किंमत 1 मार्च रोजी प्रति बॅरल $ 102 ओलांडली होती. ही इंधनाची किंमत ऑगस्ट 2014 नंतरची सर्वोच्च आहे.