विमान उडवण्यासंदर्भात संभाषण करणाऱ्या व्यक्तीला कोलकाता एअरपोर्टवर अटक
कोलकात्यावरून मुंबईला जाणाऱ्या जेट एअरवेज (Jet Airways)चे विमान उडवून टाकण्याची धमकी देणाऱ्या युवकाला पोलिसांनी आज सकाळी अटक केली आहे.
कोलकात्यावरून मुंबईला जाणाऱ्या जेट एअरवेज (Jet Airways)चे विमान उडवून टाकण्याची धमकी देणाऱ्या युवकाला पोलिसांनी आज सकाळी अटक केली आहे. विमानाचे अपहरण करुन विमान उडवून देण्याबद्दल तो बोलत होता असे सांगण्यात आले आहे. कोलकात्यावरून मुंबईला जाणाऱ्या विमानाने (Kolkata-Mumbai Jet Airways flight) तो प्रवाशी प्रवास करणार होता. यासंबंधीची माहिती मिळताच सीआईएसएफच्या (CISF) जवानांनी या तरुणाला ताब्यात घेतले आहे. अद्याप या तरुणाची इतर कोणती माहिती मिळाली नसून, पोलीस या तरुणाची चौकशी करत आहेत.
जेट एयरवेजच्या कोलकात्यावरून मुंबईला जाणाऱ्या विमानाने टेक ऑफ करताच या तरुणाने एका व्यक्तीला फोन करून बॉम्बस्फोटासंबंधी वक्तव्य केले. हे वक्तव्य त्या तरुणाच्या सहप्रवाशाने ऐकले तसेच आक्षेपार्ह कमेंटसह तो सेल्फी पाठवत असल्याचेही निदर्शनास आले. हे पाहून या सहप्रवाशाने यासंबंधीची माहिती विमानातील क्रू मेंबर्सला दिली. यानंतर सीआईएसएफच्या जवानांनी या तरुणाला अटक केली असून स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.