Pak Man Arrested in Canada: न्यूयॉर्कमध्ये ज्यूंवर दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याच्या आरोपावरून पाकिस्तानी तरुणाला कॅनडामधून अटक

इस्रायलवरील हमासच्या हल्ल्याच्या वर्धापन दिनानिमित्त 7 ऑक्टोबर रोजी न्यूयॉर्कमध्ये ज्यूंना लक्ष्य करून हल्ल्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली अमेरिकेने कॅनडामध्ये राहणाऱ्या एका 20 वर्षीय पाकिस्तानी तरूणाला अटक केली आहे.

Arrested | (File Image)

Pak Man Arrested in Canada: ॲटर्नी जनरल मेरिक गारलँड यांनी शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, खान किंवा शाहजेब जदून (Shahzeb Jadoon) यांनी इस्लामिक स्टेट ऑफ अँड अल-शाम (ISIS) च्या नावाने खून करण्याच्या उद्देशाने 7 ऑक्टोबरच्या सुमारास न्यूयॉर्कमध्ये दहशतवादी हल्ल्याची योजना आखली होती. ISIS समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहम्मद शाहजेब खान याला बुधवारी कॅनडातील(Canada)मॉन्ट्रियलच्या दक्षिण भागात सुमारे 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या ओरमेसमध्ये अटक करण्यात आली. त्याच्यावर कॅनडामध्ये तीन गुन्हे दाखल आहेत. (हेही वाचा: Vistara Mumbai-Frankfurt Flight UK27 Bomb Threat: तुर्की विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांना फ्रँकफर्ट ला नेण्यासाठी विस्ताराकडून पर्यायी विमान रवाना)

आयएसआयएसला मदत आणि शस्त्रे पुरवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली न्यूयॉर्कमधून त्याला अटक करण्यात आली आहे. शाहजेब जदून दोषी आढळल्यास त्याला 20 वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते. गाझा पट्टीत राहणाऱ्या हमासच्या दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबर रोजी जमीन, हवाई आणि समुद्रमार्गे इस्रायलवर भीषण आणि अनपेक्षित हल्ला चढवला होता.