IPL Auction 2025 Live

Gen Bipin Rawat's Chopper Crash: सीडीएस रावत, त्यांची पत्नी आणि अन्य 11 जवानांचे मृतदेह घेऊन जाणाऱ्या वाहनांपैकी एका गाडीचा बुर्लियार येथे अपघात, अनेक पोलीस जखमी

या अपघातात अनेक पोलीस जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी कारचा अपघात झाल्यानंतर इतर वाहनांना घटनास्थळी पाचारण करून पार्थिव पाठवण्यात आले.

Military Chopper Crash in Tamil Nadu (Photo Credits-ANI)

सीडीएस जनरल बिपिन रावत (Gen Bipin Rawat), त्यांची पत्नी आणि अन्य 11 जवानांचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या वाहनांपैकी एका वाहनाला अपघात झाला आहे. हा अपघात मेट्टापलायमजवळील (mettupalayam) बुर्लियार येथे झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात अनेक पोलीस जखमी झाल्याचे वृत्त आहे.  त्याचवेळी कारचा अपघात झाल्यानंतर इतर वाहनांना घटनास्थळी पाचारण करून पार्थिव पाठवण्यात आले. यावेळी स्थानिकांनी पुष्पवृष्टी करून सर्वांना श्रद्धांजली वाहिली. तामिळनाडूच्या (Tamil Nadu) निलगिरी जिल्ह्यात (Nilgiri district) बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि अन्य 11 जवानांचा मृत्यू झाला.

कोईम्बतूर आणि सुलूर दरम्यान अपघात झालेल्या एमआय-सीरीज हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 लोक होते. त्यापैकी फक्त एकच जिवंत आहे. भारतीय वायुसेनेच्या C-130J सुपर हर्क्युलस ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टद्वारे सर्व 13 मृतदेह सुलूरहून दिल्लीत आणले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी हे आधीच सुलूरहून दिल्लीला रवाना झाले आहेत. हेही वाचा Sanjay Raut On Chopper Crash: कुन्नूर हेलिकॉप्टर अपघाताबाबत पंतप्रधानांनी लोकांच्या मनातील शंका दूर केल्या पाहिजेत, संजय राऊतांची प्रतिक्रिया

त्याचवेळी जनरल रावत, त्यांची पत्नी आणि ब्रिगेडियर एलएस लिडर यांच्यासह चार मृतदेहांची ओळख पटली आहे. तर दुसरीकडे हेलिकॉप्टर दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत आपल्या भाषणात ही माहिती दिली. संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की, भारतीय हवाई दलाने तिरंगी सेवेच्या पथकाकडून चौकशीचे आदेश दिले आहेत.

याचे नेतृत्व एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ ट्रेनिंग कमांड एअर मार्शल मानवेंद्र सिंग करणार आहेत. राजनाथ सिंह म्हणाले, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफवर पूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार केले जातील. त्यांनी सांगितले की, एकमेव बचावलेला, ग्रुप कॅप्टन वरुण सिंगला लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले आहे.