Bihar Video: बिहार येथील शिक्षकाचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल, डीपीओने दिले चौकशीचे आदेश

आपल्या देशात शाळेला विशेष महत्त्व दिले जाते म्हणून शिक्षणाचे मंदिर असं देखीस संबोधले जाते. तसेच शिक्षकाला देवाचा दर्जा दिला जातो. मात्र काही शिक्षक शिक्षणाच्या मंदिरातच गलिच्छ काम करतात. असेच एक प्रकरण बिहारमधील जेहानाबाद येथून उघडकीस आले आहे

Photo Credit- Pixabay

Bihar: आपल्या देशात शाळेला विशेष महत्त्व दिले जाते म्हणून शिक्षणाचे मंदिर असं देखीस संबोधले जाते. तसेच शिक्षकाला देवाचा दर्जा दिला जातो. मात्र काही शिक्षक शिक्षणाच्या मंदिरातच गलिच्छ काम करतात. असेच एक प्रकरण बिहारमधील जेहानाबाद येथून उघडकीस आले आहे. BPSC शिक्षकाच्या आक्षेपार्ह कृत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.( हेही वाचा- पुण्यामध्ये इमारतीच्या सिक्युरिटी गार्डला डिलेव्हरी बॉय कडून लाकडी काठीने बदडलं; CCTV फूटेज वायरल)

मिळालेल्या माहितीनुसारा, शिक्षक महिलेसोबत एक अश्लील कृत्य करताना दिसले आहे. या शिक्षकाचे आक्षेपार्ह कृत्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ वर्गातील असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर डीपीओने चौकशीचे आदेश दिले आहेत.

हा व्हिडिओ जेहानाबाद सदर ब्लॉकच्या धनोटी प्राथमिक शाळेचा आहे. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या शिक्षकाचे नाव मिथिलेश कुमार असल्याचे सांगितले जात असून, तो एका महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत होता. हा व्हिडिओ इतर कोणी नसून स्वतः शिक्षकाने बनवला असल्याचे सांगण्यात येत आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागाच्या डीपीओने आरोपी शिक्षकाकडून जबाब मागितला आहे. शिक्षकांचे जबाब आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले. या शिक्षकाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनातही हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. या घटनेमुळे शिक्षकी पेशा पुन्हा एकदा बदनाम झाला आहे. @PranjalYadav000 या हँडलवरून हा व्हिडिओ ट्विटरवर  शेअर करण्यात आला आहे .

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement