Bihar Shocker! बिहारमध्ये नर्सवर डॉक्टर आणि कंपाउंडर्सकडून सामूहिक बलात्कार, लैंगिक अत्याचारानंतर केली हत्या; रुग्णवाहिकेत सापडला मृतदेह
नंतर, जयप्रकाश यांनी आम्हाला कळवले की तिची तब्येत खालावली त्यामुळे ती मुझफ्फरपूरला गेली. मात्र, त्यांनी नमूद केलेल्या रुग्णालयात ती आम्हाला आढळली नाही. बराच शोध घेतल्यानंतर आम्हाला माझ्या मुलीचा मृतदेह रुग्णवाहिकेत सापडला.
Bihar Shocker: बिहार (Bihar) च्या पूर्व चंपारण जिल्ह्यात एका खाजगी नर्सिंग होमच्या डॉक्टर आणि कंपाउंडर्सनी एका नर्सवर सामूहिक बलात्कार (Gang Raped) करून तिची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडिता मोतिहारी (Motihari) येथील जानकी सेवा सदन नर्सिंग होम (Janki Sewa Sadan Nursing Home) मध्ये काम करत होती. आरोपी डॉक्टर आणि इतर कर्मचारी फरार असून पोलिसांनी एका कंपाउंडरला अटक केली आहे.
पीडितेच्या आईने या प्रकरणी डॉ जयप्रकाश दास आणि इतर पाच जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी नर्सिंग होम सील केले आहे. 30 वर्षीय पीडित महिला विधवा असून तिला चार वर्षांचे मूल होते. पीडितेच्या आईच्या म्हणण्यानुसार, मंतोष कुमार हे डॉक्टर जयप्रकाश दास यांच्यासोबत नर्सिंग होमचे व्यवस्थापन करायचे. (हेही वाचा - Uttar Pradesh: राजभवनच्या गेटबाहेर गर्भवती महिलेने दिला बाळाला जन्म; रुग्णवाहिका न मिळाल्याने नवजात बालकाचा मृत्यू; Watch Video)
पीडितेच्या आईने सांगितले की, जावयाच्या निधनानंतर माझी मुलगी क्लिनिकमध्ये काम करायला लागली. काही दिवस काम केल्यानंतर तिने कामावर जाण्यास नकार दिला. विचारपूस केली असता, तिने डॉक्टर आणि इतरांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे सांगितले. त्यानंतर ती त्या ठिकाणी कामावर परतलीच नाही. काही दिवसांनी जयप्रकाश आणि मंतोष कुमार माझ्या घरी आले, त्यांनी माफी मागितली आणि तिला चांगल्या परिस्थिती आणि पगाराचे आश्वासन देऊन कामावर परतण्यास सांगितले.
पीडितेच्या आईने सांगितले की, तिची मुलगी 8 ऑगस्ट रोजी नर्सिंग होममध्ये गेली आणि परत आलीच नाही. नंतर, जयप्रकाश यांनी आम्हाला कळवले की तिची तब्येत खालावली त्यामुळे ती मुझफ्फरपूरला गेली. मात्र, त्यांनी नमूद केलेल्या रुग्णालयात ती आम्हाला आढळली नाही. बराच शोध घेतल्यानंतर आम्हाला माझ्या मुलीचा मृतदेह रुग्णवाहिकेत सापडला.
तिच्या आईच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी डॉक्टरसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे मोतिहारीच्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे.