Nikita Tomar Murder Case: निकिता तोमर हत्याकांड प्रकरणातील दोषी तौसिफ आणि रेहान यांना जन्मठेपेची शिक्षा; फरीदाबाद न्यायालयाचा निर्णय

तर, अन्य एक आरोपी अजहरुद्दीनची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

निकिता तोमर हत्याकांड (Nikita Tomar Murder Case) प्रकरणातील दोन्ही दोषी तौसिफ (Tauseef) आणि रेहान (Rehaan) यांना हरयाणातील फरीदाबाद न्यायालयाने (Faridabad Court) आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर, अन्य एक आरोपी अजहरुद्दीनची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. कडक पोलीस बंदोबस्तात दोन्ही दोषींना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. शिक्षा सुनावण्यापूर्वी कोर्ट कॉम्प्लेक्सचे पूर्णपणे छावणीत रूपांतर झाले होते. दरम्यान, न्यायालयाच्या सर्व दरवाजांवर भारी पोलीस बंदोबस्त तैनात होता. या प्रकरणाला 26 मार्च रोजी 5 महिने पूर्ण झाले आहेत. फरीदाबाद न्यायालयाच्या निर्णयावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अतिरिक्त सत्र न्यायाधीश सरताज बसवानाच्या फास्ट ट्रॅक कोर्टाने दोषी तौसिफ आणि रेहान यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दोघांनाही 24 मार्च रोजी दोषी ठरविण्यात आले होते. परंतु, पुरावा नसल्यामुळे शस्त्र पुरविणारा तिसरा आरोपी अजरुद्दीन याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. या प्रकरणात एकूण 57 साक्षीदारांनी साक्ष दिली. हत्येच्या अवघ्या 11 दिवसानंतर फरीदाबाद पोलिसांनी कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. हे देखील वाचा-Rajasthan: शाळेतून परतत असलेली 5 मुले कारच्या धडकेत ठार

 

विशेष म्हणजे बीकॉम ऑनर्सच्या विद्यार्थिनी निकिताला 26 ऑक्टोबर 2020 रोजी अग्रवाल महाविद्यालयासमोर गोळ्या घालून ठार मारण्यात आले. याप्रकरणात हत्येचा आरोप असलेल्या सोहना येथील रहिवासी तौसिफ, रेहान आणि नुहचा रहिवासी अझरुद्दीन या तिघांना पोलिसांनी तात्काळ अटक केली होती.

दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयाचे निकिताच्या आई-वडिलांनी स्वागत केले आहे. तसेच याप्रकरणातील दोषींना फाशिची शिक्षा मिळावी म्हणून ते सर्वोच्च न्यायालयात लढा देणार असल्याची माहिती समोर येत आहे. महत्वाचे म्हणजे, दोषीला निकिताचे धर्म परिवर्तन करून तिच्याशी लग्न करायचे होते. परंतु, निकिताने नकार दिला. यामुळे तिची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे, असा आरोप निकीताचे वडील मूलचंद तोमर केला आहे.