Yes Bank खातेदारांची बँक, एटीएम कडे धाव; मात्र ATM मध्ये खडखडाट
हे निर्धंब तात्काळ लागू होत असल्याचे केंद्र सरकारने जाहीर करताच येस बँकेच्या खातेदारांचा पुरता गोंधळ उडाला.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) खाजगी क्षेत्रातील येस बँकेवर (Yes Bank) गुरुवार, 5 मार्च रोजी निर्बंध लागू केल्यानंतर आता येस बँकेच्या खातेदारांना महिन्याला केवळ 50 हजार रुपयेच खात्यातून काढता येणार आहेत. हे निर्बंध तात्काळ लागू होत असल्याचे केंद्र सरकारने जाहीर करताच येस बँकेच्या खातेदारांचा पुरता गोंधळ उडाला. त्यामुळे येस बँकेच्या ग्राहकांनी तातडीने एटीएमच्या दिशेने धाव घेतली असता काही एटीएम बंद होते तर काही एटीएममध्ये कॅश नसल्याचे बोर्ड ग्राहकांना पाहायला मिळाले. तसंच RBI च्या निर्यणानंतर खातेदारांनी मोबाईल (Mobile) आणि इंटरनेट बँकींगच्या (Internet Banking) माध्यमातूनही पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला. मात्र या सेवा देखील डाऊन झाल्या आहेत. (RBI कडून Yes Bank वर 5 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत स्थगिती; ठेवीदार खात्यातून काढू शकणार फक्त 50,000 रुपये)
रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर आज सकाळपासूनच मुंबईतील येस बँकेच्या फोर्ट शाखेबाहेर ग्राहकांची भलीमोठी रांग पाहायला मिळत आहे.
ANI Tweet:
मुंबईतील परेल येथे असणाऱ्या येस बँकेच्या एटीएमबाहेर कॅश नसल्याचे बोर्ड पाहायला मिळत आहेत.
ANI Tweet:
मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या येस बँकेच्या व्यवस्थापनाशी आरबीआय सातत्याने चर्चा करत होती. मात्र भांडवल उभे करण्यात बँकेला अपयश आले. त्यामुळे बँकेच्या व्यवसायाची गुणवत्ता घरसत असल्याचे कारण देत रिझर्व्ह बँकेने हे निर्बंध लागू केले. कालपासून लागू झालेली RBI ची स्थगिती 3 एप्रिल पर्यंत कायम राहील.
सहा महिन्यांपूर्वी आरबीआयने पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटीव्ह बँकेवर स्थगिती आणली होती. आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या या बँकेतून केवळ 10 हजार रुपये काढण्याचे लिमिट होते. त्यानंतर आरबीआयने ही मर्यादा वाढवत 40 हजार केली.