Go Back Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोशल मीडियातून विरोध; ट्विटरवर #TNwelcomesXiJinping, #GoBackModi हॅशटॅग ट्रेंड
दरम्यान, शी जिनपींग यांचे स्वागत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज दुपारी 12 वाजता चेन्नई विमानतळावर दाखल झाले. तसेच, शी जिनपींग यांचेही आगमन भारतात झाले. दरम्यान, नरेंद्र मोदी यांना तामिळनाडू जनतेचा विरोध असल्याचे दिसते आहे.
तामिळनाडू राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोशल मीडियावरुन जोरदार विरोध पाहायला मिळत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) आज भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांचे स्वागत करण्यासाठी पंतप्रधन नरेंद्र मोदी (PM Modi) हे स्वत: चेन्नई विमानतळावर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, हेच निमित्त साधत नेटकऱ्यांनी ट्विटरच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांना प्रचंड विरोध दर्शवला आहे. काही युजर्सनी तर #GoBackModi ही मोहीमच चालवली आहे. त्यामुळे ट्विटरवर आज सराळपासूनच #GoBackModi हा ट्रेंड दिसत आहे. दरम्यान, आता #TNWelcomesModi हा हॅशटॅगही ट्विटरवर ट्रेण्ड होताना दिसत आहे. विशेष म्हणजे तामिळनाडूत शी जिनपींग यांचे स्वागत होताना दिसत आहे. हे स्वागत करताना #TNwelcomesXiJinping हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे.
तामिळनाडूच्य जनतेचा शी जिनपिंग यांना नाही परंतू मोदींना विरोध असल्याचे दिसत आहे. दरम्यान, शी जिनपींग यांचे स्वागत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज दुपारी 12 वाजता चेन्नई विमानतळावर दाखल झाले. तसेच, शी जिनपींग यांचेही आगमन भारतात झाले. दरम्यान, नरेंद्र मोदी यांना तामिळनाडू जनतेचा विरोध असल्याचे दिसते आहे.
ट्विट
ट्विट
ट्विट
ट्विट
ट्विट
ट्विट
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात #GoBackModi हा हॅशटॅग ट्रेण्ड होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याही आधी #GoBackModi हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेण्ड झाल्याचे पाहायला मिळाले आहे. लोकसभा निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तामिळनाडू राज्यात गेले होते. तेव्हा त्यांना तीव्र विरोध झाला होता. दरम्यान, त्यानंतरही मोदी दोन वेळा तामिळनाडू राज्यात गेले होते. तेव्हाही त्यांना विरोध झाला होता. (हेही वाचा,पंतप्रधान नरेंद्र मोदी-शी जिनपिंग भेटीवर जगाचे लक्ष, दहशतवाद, व्यापारी सबंधांवर होणार चर्चा)
ट्विट
ट्विट
ट्विट
ट्विट
ट्विट
दरम्यान, चिनमधील नेटकऱ्यांनीही #回到莫迪 (Huí dào mò dí) हा हॅशटॅग वापरत मोदी परत जा असे ट्विट केल्याचे दिसते. शी जिनपिंग यांचे चेन्नई विमानतळावर आज (शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019) दुपारी आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: त्यांच्या स्वागताला उपस्थित होते. या वेळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी हेसुद्धा उपस्थित होते. शी जिनपिंग आइटीसी ग्रांड चोला हॉटेलमध्ये उतरणारआहेत. त्यानंतर पुढे ते महाबलीपुरमकडे रवाना होतील. पंतप्रधान नरेंद्र आणि शी जिनपिंग यांच्यात शनिवारी चर्चा होईल.