पंतप्रधान नरेंद्र मोदी-शी जिनपिंग भेटीवर जगाचे लक्ष, दहशतवाद, व्यापारी सबंधांवर होणार चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: त्यांच्या स्वागताला उपस्थित असतील. दरम्यान या वेळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी हेसुद्धा उपस्थित राहणार आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्यात दुसऱ्या अनौपचारिक शिखर परिषदेची आज (शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019) सुरुवात होत आहे. दोन्ही नेते उभय देशांतील आर्थिक, सांस्कृतिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चे करतील. दोन्ही नेत्यांच्या बैठकीत काश्मीर आणि दहशतवाद या मुद्द्यांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. या चर्चेवेळी दहशतवादाच्या मुद्द्यावरुन भारत पाकिस्तानची चिनसमोर कोंडी करेल अशी आपेक्षा व्यक्त केली जात आहे. शी जिनपींग हे भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असतील. या दौऱ्यात मोदी आणि जिनपिंग सुमारे चार वेळा बैठक करण्याची शक्यता आहे.
जिनपिंग यांच्या स्वागतासाठी तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे मामल्लापुरम (महाबलीपुरम) येथे चोख व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही नेत्यांची भेट याच शहरात होत असल्याने शहराला सुरक्षाव्यवस्थेची तटबंदी असलेल्या किल्ल्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. तसेच, शहरही खास पद्धतीने सजविण्यात आले आहे.
चीन राजदूत सुन वीदोंग यांनी म्हटले आहे की, दोन्ही देशांकडून (भारत-चीन) हे एकमेकांना मुळीच धोका नाही. शिखर बैठकीत दोन्ही देश विकास, व्यापार आणि इतर मुद्द्यांवर एकमेकांशी संमती व्यक्त करतील. अशिया खंडात शांतता आणि सकारात्मक उर्जा प्राप्त करण्यासाठी दोन्ही देशांचे सहकार्य महत्त्वपूर्ण आहे. भारत-चीन सहकार्याच्या जोरावर चीन अशिया खंडात ताकद उभा करु शकतो, असेही राजदूत सुन वींदोगा यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, 'काश्मीर हा आमचा अंतर्गत विषय, इतरांनी त्यात नाक खुपसू नये'; इमरान खान-शी जिनपिंग मुलाखतीनंतर काश्मीरप्रश्नी चीनी घुमजावाला भारताकडून सडेतोड प्रत्युत्तर)
एएनआय ट्विट
शी जिनपिंग यांचे चेन्नई विमानतळावर आज (शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019) दुपारी 2.10 मिनिटांनी पोहोचतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: त्यांच्या स्वागताला उपस्थित असतील. दरम्यान या वेळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी हेसुद्धा उपस्थित राहणार आहेत. शी जिनपिंग आइटीसी ग्रांड चोला हॉटेलमध्ये उतरणारआहेत. त्यानंतर पुढे ते महाबलीपुरमकडे रवाना होतील. पंतप्रधान नरेंद्र आणि शी जिनपिंग यांच्यात शनिवारी चर्चा होईल.