Work From Home During Menstruation: खुशखबर! महिला मासिक पाळीदरम्यान करू शकतात घरून काम; 'हे' राज्य घेऊ शकते मोठा निर्णय
बालकांवरील वाढत्या लैंगिक गुन्ह्यांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने राज्यातील सर्व महाविद्यालये, शाळा, जिल्हास्तर आणि पंचायत समिती स्तरावर जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राजस्थान (Rajasthan) सरकारकडून महिलांना लवकरच चांगली बातमी दिली जाऊ शकते. यापुढे महिलांना कार्यालयात मासिक पाळीदरम्यान (Menstruation Cycle) समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. राजस्थान राज्य समाज कल्याण मंडळाने मासिक पाळीच्या काळात महिलांसाठी घरून काम करण्यासह इतर 9 तरतुदी राज्य सरकारला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आता या तरतुदींना राज्य सरकार लवकरच मान्यता देऊ शकते.
राजस्थान राज्य समाज कल्याण मंडळाची दुसरी सर्वसाधारण सभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. मंडळाच्या अध्यक्षा डॉ.अर्चना शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. सामाजिक न्याय व अधिकारिता विभागाच्या आंबेडकर भवन येथील सभागृहात ही बैठक झाली.
बैठकीत गुड टच-बॅड टच कार्यशाळा, महिलांच्या मासिक पाळीच्या काळात घरून कामाची तरतूद, कौटुंबिक समुपदेशन केंद्र, वृद्धाश्रम संचालन, यशोदा पालन गृह योजना, आंतरराष्ट्रीय भाषा अध्यापन केंद्राची स्थापना आदी विविध प्रस्तावांना प्रशासकीय विभागामार्फत मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ.शर्मा म्हणाले की, राज्यातील लोककल्याणकारी योजना, महिला व बालकांचे कल्याण व उन्नतीसाठी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. (हेही वाचा: Free Dish TV: खुशखबर! आता मोफत धान्यानंतर सरकार देणार फ्री डिश टीव्ही, जाणून घ्या सविस्तर)
बालकांवरील वाढत्या लैंगिक गुन्ह्यांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने राज्यातील सर्व महाविद्यालये, शाळा, जिल्हास्तर आणि पंचायत समिती स्तरावर जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यामध्ये त्यांना गुड टच-बॅड टच आणि इतर कल्याणकारी योजनांची माहिती दिली जाईल. दरम्यान, काही भारतीय कंपन्यांनी मासिक पाळीदरम्यान महिलांना रजा देण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच दिल्लीस्थित एका कंपनीने आपल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळी सुट्टी जाहीर केली आहे. ओरिएंट इलेक्ट्रिक नावाच्या कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे.