धक्कादायक! पतीसोबत झालेल्या वादामुळे रागाच्या भरात महिलेने पोटच्या 5 मुलांना गंगा नदीत दिले फेकून
मंजू यादव असे या आरोपी महिलेचे नाव आहे. पोलिसांनी तिला अटक केले असून अधिक तपास करत आहेत.
उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) हृदयाचा थरकाप उडवून देणारी घटना उघडकीस आली आहे. भदोही परिसरातील एका महिलाने पतीसोबत झालेल्या भांडणामुळे रागाच्या भरात आपल्या पोटच्या 5 मुलांना गंगेच्या पात्रात फेकून दिले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच या मुलांना शोधण्याचे काम सुरु आहे. यात 3 मुली आणि 2 मुलांचा समावेश असून 1 मुलीचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे. मंजू यादव असे या आरोपी महिलेचे नाव आहे. पोलिसांनी तिला अटक केले असून अधिक तपास करत आहेत.
आरोपी महिलेकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिचे शनिवारी तिच्या पतीसोबत भांडणं झाले. त्याच मध्यरात्री ती आपल्या पाचही मुलांना घेऊन गंगा घाटावर गेली. त्यावेळी पती घरात नव्हता. त्यानंतर तिने आपल्या पाचही मुलांना गंगा नदीत फेकून परत घरी आली. वंदना (12), रंजना (10), पूजा (6), शिव शंकर (8) आणि संदीप (5) अशी मुलांची नावं आहेत. बारामती येथे अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने वार करत ठार करण्याचा प्रयत्न; आरोपीवर गुन्हा दाखल
आसपासच्या परिसरातील गावक-यांना तसेच कुटूंबियांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तात्काळ मुलांचा तपास सुरु केला आहे. महिलेने आपला गुन्हा कबूल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर (Minor Boy) धारदार शास्त्राने वार करून विहिरीत फेकून दिल्याची घटना उघडकीस आले. ही घटना बारामती (Baramati) शहरात शुक्रवारी सायंकाळी घङली. संबंधित मुलाला ठार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी (Police) आरोपीवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच हत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट असून पोलीस याप्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.