Mamata Banerjee's Video: ममता बॅनर्जी यांचे समर्थकांना शांतता राखण्याचे अवाहन; रुग्णालयातून व्हिडिओ प्रसिद्ध केला

त्यांनी रुग्णालयातूनच व्हिडिओ संदेश जारी केला आहे. या संदेशात त्यांनी म्हटले आहे की, मी सर्वांना शांततेचे अवाहन करते आहे. कोणीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य करु नये. मला काही दिवस व्हिलचेअरवर रहावे लागेल. परंतू, हरकत नाही मी लवकरच आपल्या भेटीला येईन.

Mamata Banerjee | ( Photo Credits: Twitter/ ANI)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी एक व्हिडिओ प्रसारीत केला आहे. हा व्हिडिओ त्यांनी रुग्णालयातून प्रसिद्ध केला आहे. व्हिडिओच्या माध्यमातून ममता बॅनर्जी यांनी आपल्या समर्थकांना शांततेचे अवाहन केले आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर कोलकाता येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्यावर नंदीग्राम येथे ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला होता. या त्या जखमी झाल्या होत्या. ममता बॅनर्जी यांच्या पाय आणि कंबरेला दुखापत झाली आहे. त्यांनी रुग्णालयातूनच व्हिडिओ संदेश जारी केला आहे. या संदेशात त्यांनी म्हटले आहे की, मी सर्वांना शांततेचे अवाहन करते आहे. कोणीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य करु नये. मला काही दिवस व्हिलचेअरवर रहावे लागेल. परंतू, हरकत नाही मी लवकरच आपल्या भेटीला येईन.

ममता बॅनर्जी यांनी पुढे म्हटले की, माझ्या शरीराच्या डाव्या बाजूला आणि लिगामेंटमध्ये दुखापत झाली आहे. मला चेस्टपेनही जाणवत आहे. मी कारमधून लोकांना अभीवादन करत होती. माझ्यावर उपचार करण्यासाठी कोलकाता येथे आणण्यात आले. मी दोन तीन दिवसांमध्ये परतणार आहे. माझ्या पायांवर जखमा आहेत. परंतू, मी मॅनेज करेन. मी आपल्या भेटीला येईन.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाने आज आपल्या 291 उमेदवारांची यादी जाहीर केली. तृणमूल काँग्रेसच्या सर्व्हेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही यादी जाहीर केली. ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, तृणमूल काँग्रेस या वेळी एकूण 294 पैकी 291 जागांवर निवडणूक लढवत आहे. 3 जागांवर तृणमूल काँग्रेस निवडणूक लढवणार नाही. या तीन जागा मित्रपक्षांना सोडण्यात येत आहेत. तसेच, ममता बॅनर्जी या स्वत: नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याचेही त्यांनी या वेळी जाहीर केले.