West Bengal Assembly Election 2021 Exit Polls Results: पश्चिम बंगाल मध्ये ममता दीदींचा TMC सत्ता राखणार; एक्झिट पोलचा अंदाज

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 283 जागांसाठी मतदान पार पडले. या वेळी पश्चिम बंगालची निवडणूक काहीशी वेगळी होती. या निवडणुकीत कोरोना व्हायरस या जागतीक महामारीचा प्रमुख मुद्दा निवडणूक प्रचारात वापरला गेला.

Assembly Election 2021 Exit Poll Result | (File Image)

पश्चिम बंगाल मधील विधानसभा निवडणूकीचे एक्झिट पोल हाती येण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये ममता बॅनर्जी यांचा टीएमसी सत्ता राखेल असा अंदाज बांधण्यात  आला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 (West Bengal Assembly Election 2021) तब्बल आठ टप्प्यांमध्ये पार पडली. कोरोना व्हायरस (Coronavirus Pandemic) महामारी काळात पार पडलेल्या या निवडणुकीच्या निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. येत्या 2 मे 2021 या दिवशी या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी होणार आहे. तोपर्यंत एक्झिट पोल्सचे अंदाज (West Bengal Assembly Election 2021 Exit Polls Results) व्यक्त होऊ लागले आहेत. एक्झिट पोल्सचे ( Exit Polls) हे अंदाज म्हणजे काही मतमोजणीतील निकाल नव्हे. हे खरे असले तरी एक्झिट पोल्समुळे जनतेच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज येऊ शकतो. एक्झिट पोल्सचा अंदाज पाहिला तर यापूर्वी अनेक वेळा एक्झिट पोल्सचे अंदाज चुकले आहेत. त्यामुळे एक्झिट पोल्सचे अंदाज आणि आकडे जाणून घेताना त्याकडे केवळ माहिती म्हणूनच अनेकदा पाहिले जाते.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी एकूण आठ टप्प्यात मतदान पार पडले. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 283 जागांसाठी मतदान पार पडले. या वेळी पश्चिम बंगालची निवडणूक काहीशी वेगळी होती. या निवडणुकीत कोरोना व्हायरस या जागतीक महामारीचा प्रमुख मुद्दा निवडणूक प्रचारात वापरला गेला. त्यातच ममता बॅनर्जी यांनी सत्तेत पुनरागमन करत हॅटट्रीक साधण्यासाठी जोरदार शक्ती पणाला लावली. तर दुसऱ्या बाजूला केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने ममता बॅनर्जी यांच्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षासमोर जोरदार आव्हान उभे केले. ABP C-Voter Exit Poll Results 2021 Live Streaming: पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, असम, पुदुच्चेरी विधानसभा निवडणूक एक्झिट पोल निकाल इथे पहा लाईव्ह.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह या जोडगोळीनेही पश्चिम बंगालमध्ये जोरदार प्रचार केला. विशेष म्हणजे कोरोना व्हायरस महामारी असतानाही पंतप्रधान हजारोंच्या संख्येने गर्दी जमवताना दिसले. काँग्रेस आणि डावे पक्ष त्यांच्या त्यांच्या पातळीवर आघाडी करुन लढताना दिसले.

एक्झिट पोल्स निकाल

1) टाइम्स नाउ

तृणमूल काँग्रेस (टीएमसी)- 158

भाजप- 115

काँग्रेस ,लेफ्ट- 22

2) ABP News-C Voter

तृणमूल काँग्रेस (टीएमसी)- 152-164

भाजप- 109-121

काँग्रेस- 14-25

 

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत, ममता बॅनर्जी यांनी 44 दिवस व्हिलचेअरवर बसून प्रचार केला. तर त्यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी रोड शो करताना दिसला. भाजप च्या वतीने पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी जवळपास 20 सभा घेतल्या तर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी तब्बल 70 रॅली केल्या. ममता बॅनर्जी यांनी 150 सभा घेतल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेवटच्या टप्प्यात कोरोना व्हायरस महामारीचा धोका विचारात घेऊन आपल्या रॅली रद्द केल्या.