India Weather Update: स्वातंत्र्या दिनाच्या दिवशी महाराष्ट्र, दिल्लीसह 27 राज्यात पावसाची शक्यता, राजधानीत यलो अलर्ट जारी
भागात मुसळधार पावसाची स्थिती आजच नाही तर पुढील सात दिवस कायम राहणार आहे.
आज भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. यानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर ध्वजवंदन केले आहे. थोड्याच वेळात ते देशाला संबोधित केले आहे. देशात सगळीकडे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. पण या आनंदावर विरजन पडण्याची शक्यता आहेत. कारण, राजधानी दिल्लीमध्ये आज जारी करण्यात आला आहे. स्वातंत्रदिनाचा उत्साहावेळी दिल्लीमध्ये आणि 27 राज्यात हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दिल्लीमध्ये सकाळी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिल्लीसह पश्चिम हिमालयीन प्रदेशात आणि दक्षिण, पूर्व आणि ईशान्य भारतातील सर्व भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. (हेही वाचा - Mumbai Weather Forecast: मुंबईत आज आभाळ ढगाळ, जाणून घ्या उद्याचे हवामान आणि AQI)
भारतीय हवामान विभागाने (IMD) आज दिल्लीसह देशातील 27 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. भागात मुसळधार पावसाची स्थिती आजच नाही तर पुढील सात दिवस कायम राहणार आहे. म्हणजे उत्तराखंड-हिमाचल प्रदेशच्या पर्वतांपासून ते राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, ईशान्य भारतातील सर्व राज्ये, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दिल्लीमध्ये आज तापमान 34.2 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राजस्थानमध्येही पावसामुळे परिस्थिती बिकट आहे. जयपूर, अलवर, करौली, सवाई माधोपूर, दौसा या पाच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली. मुंबईत 32 अंश सेल्सिअस कमाल तर 24 अंश सेल्सिअस किमान तापमान 15 ऑगस्ट रोजी असेल. पुण्यात 31 अंश सेल्सिअस कमाल तर 23 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.