Vidhan Sabha Election 2024 Date: जम्मू आणि काश्मीरमध्ये 18 सप्टेंबरपासून 3 टप्प्यात मतदान; तर 1 ऑक्टोबर रोजी हरियाणामध्ये पहिल्या टप्प्यात पार पडणार निवडणुक

निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणामध्ये 1 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 4 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

CEC Rajiv Kumar | (Photo Credit: ANI)

Vidhan Sabha Election 2024 Date: हरियाणा (Haryana), जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections 2024) तारखा जाहीर झाल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, हरियाणात विधानसभेच्या जागा 90 आहेत. हरियाणात 2.1 कोटी मतदार आहेत. हरियाणात 20 हजारांहून अधिक मतदान केंद्रे बांधली जाणार आहेत. सर्वसाधारणसाठी 73 जागा आणि अनुसूचित जातीसाठी 17 जागा असतील. हरियाणातील मतदारांची यादी 27 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाईल. निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणामध्ये 1 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 4 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

हरियाणामध्ये पहिल्या टप्प्यात होणार मतदान -

हरियाणामध्ये फक्त एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. हरियाणात 12 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. यानंतर 13 सप्टेंबर रोजी अर्जांची छाननी होणार असून 16 सप्टेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. 1 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तसेच निवडणुकीचा निकाल 4 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, हरियाणात एकूण 2.1 कोटी मतदार आहेत, त्यापैकी शंभर वर्ष पार मतदारांची संख्या 10 हजारांहून अधिक आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने हरियाणामध्ये विजय मिळवला होता. येथे गेल्या निवडणुकीत भाजपला 40 तर काँग्रेसला 31 जागा मिळाल्या होत्या.

जम्मू-काश्मीरसाठी विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर -

जम्मू-काश्मीरमध्ये 3 टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणूक 18 सप्टेंबरला, दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक 25 सप्टेंबरला, तर तिसऱ्या टप्प्याची निवडणूक 1 ऑक्टोबरला होणार आहे. पहिल्या टप्प्यात जम्मू-काश्मीरमध्ये 4 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

तथापी, हरियाणामध्ये 1 ऑक्टोबरला मतदान होणार असून, 4 ऑक्टोबरला येथेही निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. अशाप्रकारे पाहिले तर, यावेळी निवडणूक आयोग दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीत दोन्ही राज्यांमध्ये निवडणुका घेणार आहे.