Videocon Chairman Venugopal Dhoot Arrested: व्हिडिओकॉन कंपनीचे सीईओ वेणुगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक
आयसीआयसी बँक व्हिडिओकॉन मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही आटक झाल्याचे समजते आहे.
व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत ( Venugopal Dhoot by CBI) यांना आज सीबीआयने अटक केली. आयसीआयसीआय कर्ज प्रकरणात ( ICICI loan case) महत्त्वाच्या व्यक्तींनाच झालेल्या अटकेपैकी ही तिसरी मोठी अटक आहे. आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर (Chanda Kochhar) आणि त्यांचे पती दीपक कोचर (Deepak Kochhar) यांना सीबीआयने पाठिमागच्या आठवड्यातच अटक केली आहे. खाजगी क्षेत्रातील बँकेचे (ICICI ) प्रमुख असताना व्हिडिओकॉन समूहाला दिलेल्या ₹3,000 कोटींहून अधिक कर्जाच्या कथित अनियमिततेशी कोचर पती पत्नींना अटक झाली आहे.
मुंबई सीबीआय कोर्टासमोर हजर केल्यनंतर 59 वर्षीय चंदा कोचर यांची पुढील चौकशी केली जाणार आहे. चंदा कोचर यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा दिला होता. व्हिडिओकॉन ग्रुप या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि तेल आणि वायू शोध कंपनीला कर्जवितरण करताना झुकते माप दिल्याचा कोचर यांच्यावर आरोप झाला होता. या आरोपांनंतर कोचर यांनी आपल्या पदाचा राजीमाना दिला होता. (हेही वाचा, Chanda Kochhar Arrested by CBI: आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चांदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयकडून अटक)
ट्विट
दरम्यान, सीबीआयने चंदा कोचर यांच्यवर आरोपी ठेवला आहे की, त्यांनी ICICI बँकेसाठी नॉन-परफॉर्मिंग अॅसेट बनलेल्या व्हिडिओकॉन समूहाला 2012 मध्ये ₹ 3,250 कोटींच्या कर्जामध्ये गुन्हेगारी कट रचला आणि ग्राहकांची फसवणूक केली. चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना या व्यवहारातून फायदा झाल्याचा आरोप एका व्हिसलब्लोअरने केला होता. त्यानंतर हे प्रकरण चौकशीच्या फेऱ्यात अडकले.