VIDEO: सोनप्रयागमध्ये डोंगर कोसळला! उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने केला कहर
सोनप्रयागमध्ये केदारनाथ धामच्या अवघ्या 15 किलोमीटरवर डोंगर कोसळला. डोंगर कोसळताच भाविकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. मात्र, या घटनेत कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे.
VIDEO: उत्तराखंडच्या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन सुरूच आहे. सोनप्रयागमध्ये केदारनाथ धामच्या अवघ्या 15 किलोमीटरवर डोंगर कोसळला. डोंगर कोसळताच भाविकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. मात्र, या घटनेत कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे. पावसामुळे डोंगराला तडे जाणे, डोंगर कोसळणे ही बाब नित्याचीच झाली आहे. यंदा मान्सून आधीच जोरदार आणि विनाशकारी ठरला आहे. सोनप्रयागमध्ये डोंगर कोसळण्याच्या घटनेने स्थानिक प्रशासनात खळबळ उडाली आहे.
पाहा पोस्ट:
काय करायचं?
उत्तराखंडला जाणाऱ्या पर्यटक आणि भाविकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
खराब हवामानात डोंगराळ भागात प्रवास करणे टाळा.
स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.
तुम्ही डोंगराळ भागात अडकल्यास मदतीसाठी ताबडतोब स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.