Chennai Airport Customs: तीन कोटी किमतीच्या Amphetamine सह एकास अटक, चेन्नई विमानतळ सीमाशुल्क विभागाची कारवाई (व्हिडिओ)
धक्कादायक म्हणजे त्याच्याकडून 1,539 ग्रॅम अॅम्फेटामाइन (Amphetamine ) जप्त करण्यात आले.
चेन्नई विमानतळावरील ( Chennai Airport ) सीमाशुल्क (Chennai Customs) अधिकाऱ्यांनी अॅम्फेटामाइनची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे त्याच्याकडून 1,539 ग्रॅम अॅम्फेटामाइन (Amphetamine ) जप्त करण्यात आले. बाजारात त्याची किंमत 3 कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. हा व्यक्ती सोबत असलेल्या सामानाच्या रिकाम्या जागेमध्ये हा पदार्थ लपवून नेण्याचा प्रयत्न करत होता, असे अधिकाऱ्यांनी बुधवारी (15 फेब्रुवारी) सांगितले.
चेन्नई कष्टमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात वृत्तसंस्था आयएनएसने म्हटले आहे की, हा व्यक्ती गिनीहून आदिस अबाबा मार्गे भारतात (चेन्नई) आला होता. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार 12 फेब्रुवारी त्याला ताब्यात घेण्यात आले. (हेही वाचा, Turtles Smuggling : नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसमधून 157 कासव हस्तगत; 9 तस्करांना अटक)
सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला जेव्हा ताब्यात घेतले तेव्हा आरोपीकडे एक बॅग आढळली. त्याच्या बॅगेची झडती घेतली असता बॅगच्या ताळाशी एक काळ्या रंगाचे पुडके आढळून आले. ज्यात पांंढऱ्या रंगाचा विशिष्ट पदार्थ होता. अधिकाऱ्यांनी या पदार्थाची तपासणी केली असता हा पदार्थ अॅम्फेटामाइन असल्याचे लक्षात आले. या अॅम्फेटामाइनचे वजन 1,539 ग्रॅम होते. ज्याची बाजारातील किंमत 3 कोटींपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
ट्विट
अधिकाऱ्यानी पुढे सांगितले की, आरोपींनी एनडीपीएस कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे एनडीपीएस कायद्याच्या कलम 21, 23 आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला एनडीपीएस कायद्याच्या कलम 43 (बी) अंतर्गत अटक करण्यात आली. तसेच, एनडीपीएस कायद्याच्या कलम 43 (अ) अंतर्गत लपविलेल्या साहित्यासह अॅम्फेटामाइन जप्त करण्यात आले.