Varanasi Cop Beaten up: वाराणसीमध्ये कार अपघातात पोलिस अधिकाऱ्यावर जमावाचा हल्ला; गाडीतून खेचून पत्नी आणि मुलांसमोर बेदम मारहाण (Video)
या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओही समोर आला आहे.
Varanasi Cop Beaten up: यूपीच्या वाराणसीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याला कारमधून ओढून मारहाण करण्यात (Cop Thrashed) आली. एवढेच नाही तर पोलिस अधिकाऱ्याला मारहाण (Cop Beaten Up) होत असताना त्या अधिकाऱ्याची पत्नी आणि मुलेही तेथे उपस्थित होती. या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओही समोर आला आहे. (हेही वाचा:Ola Scooter Smash With Hammer: नव्या ओला स्कूटीच्या पहिल्या सेर्वीसचे 90 हजारांचे बील...पठ्ठ्याने संतापाच्या भरात शोरूमसमोरच दुचाकी फोडली (Video) )
काय आहे संपूर्ण प्रकरण?
यूपीच्या वाराणसी राजतलाब पोलीस ठाण्याचे प्रमुख अजित वर्मा शनिवारी संध्याकाळी साध्या गणवेशात कुटुंबासह नातेवाईकांच्या घरी जात होते. दरम्यान, भरधाव वेगात आलेल्या त्यांच्या कारने दुसऱ्या ऑटोला धडक दिली. ऑटो चालक गंभीर जखमी झाला. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी झाली. जमावाने धावत जाऊन कारला घेराव घातला आणि एसओ पोलीस अधिकाऱ्याला गाडीतून बाहेर काढून मारहाण केली.
पोलिस अधिकाऱ्यावर जमावाचा हल्ला
यावेळी पोलीस अधिकाऱ्याने त्याची बाजू मांडण्याचा परयत्न केला. पण लोक ऐकायला तयार नव्हते. संतप्त जमावाने त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. जमावाने एसओला हाताशी धरून बेदम मारहाण केली. काही वेळाने पोलीस घटनास्थळी पोहोचले. जमावाने पोलिसांसमोरच एसओला मारहाण केली. पोलिसांनी खूप समजावून सांगितल्यानंतर लोकांनी त्यांना सोडून दिले. दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी केल्या आहेत.
मारहाणी प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही. दोन्ही बाजूंनी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हा एफआयआर एसओ अजित वर्मा यांनी दाखल केला आहे. तर दुसरा एफआयआर जखमी ड्रायव्हर शंकर राय यांचा मुलगा आयुष राय याने दाखल केला आहे.
यूपीच्या संभलमध्ये हिंसाचारात अनेक पोलीस जखमी झाले आहेत. येथे संतप्त जमावाने अनेक वाहनांना आग लावली असून या हिंसाचारात एसपी, सीओ आणि इन्स्पेक्टरसह अनेक पोलीस जखमी झाले आहेत. जमावाने पोलिसांवर दगडफेक केली.