Uttarakhand Rain and Flood Updates: उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस, महापूर; 34 जणांचा मृत्यू, पाहा PHOTOS आणि VIDEOS

तर पाच जण बेपत्ता आहेत. हवामान विभागाने म्हटले आहे की, 18 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या काळात उत्तराखंड (Uttarakhand) राज्यातील कुमाऊं परिसरात इतिहासातील सर्वात विक्रमी पर्जन्यवृष्टी (Torrential Rain In Uttarakhand) झाली आहे.

Uttarakhand Flood | (Photo Credit: ANI)

देवभूमी उत्तराखंड (Devbhoomi Uttarakhand) पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे जलमय स्थितीत गेली आहे. संततधार पसरणाऱ्या मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये (Uttarakhand Torrential Rain) मोठ्या प्रमाणावर महापूर (Uttarakhand Flood) आला आहे. अनेक ठिकाणी रस्ते, गावे आणि शेतं पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने (NDRF) मदत आणि बचाव कार्य सुरु केले आहे. दरम्यान, हाती आलेली माहिती अशी की, मुसळधार पाऊस आणि महापूर यामुळे 34 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण बेपत्ता आहेत. हवामान विभागाने म्हटले आहे की, 18 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या काळात उत्तराखंड (Uttarakhand) राज्यातील कुमाऊं परिसरात इतिहासातील सर्वात विक्रमी पर्जन्यवृष्टी (Torrential Rain In Uttarakhand) झाली आहे.

उत्तराखंड राज्यातील चम्पावत जिल्ह्यात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर पाऊस पाहायला मिळत आहे. या जिल्ह्यात निर्माणाधीन असलेला पूल पुरामुळे वाहून गेला आहे. अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल लाईन तुटली आहे. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क जवळ नैनिताल येथे एक हत्ती पाण्यात अडकल्याचे पुढे आले होते. मुक्तेश्वर आणि नैनीताल च्या खैरना परिसरात घर कोसळून 7 जणांचा मृ्त्यू झाला आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी यांना राज्यातील प्राप्त स्थिती अवगत केली आहे. काही ठिकाणी घर, पूल आदि आपत्तीग्रस्त झाले आहेत. मदत आणि बचाव कार्यासाठी तीन हेलीकॉप्टर तैनात करण्यात आली आहेत. (हेही वाचा, Kerala Flood: केरळमध्ये आलेल्या पुरात 33 जणांचा बळी, 11 जिल्ह्यांसाठी यल्लो अलर्ट जाहीर)

Uttarakhand Flood

पंतप्रधान नेरंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांसोबत मंगळवारी संवाद साधला आहे. या संवाधात त्यांनी मुसळधार पाऊस आणि महापूराची माहिती घेतली.

Uttarakhand Flood

हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील कुमाऊं परिसरात इतिहासातील सर्वात विक्रमी पाऊस पडला आहे. हवामान विभागाच्या डेहराडून येथील कार्यालयाने म्हटले आहे की, पंतनगर परिसरात 18 ते 19 ऑक्टोबर या काळात 403.2 mm इतका पाऊस झाला. हा आतापर्यंतचा विक्रम आहे.

Uttarakhand Flood

उत्तराखंड मध्ये या आधी 31 वर्षांपूर्वी याच ठिकाणी सर्वाधिक म्हणजे 228 mm झाला होता. हा पाऊस 10 जुलै, 1990 रोजी पाऊस झाला होता. त्यानंतर मुक्तेश्वर येथेही 18 ते 19 ऑक्टोबर या काळात 340.8 mm इतका विक्रमी पाऊस झाला. त्या आधी 107 वर्षांपूर्वी 18 सप्टेंबर 1914 मध्ये सर्वाधिक 254.5 mm इतका पाऊस झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mustafa Quraishi (@mustafaquraishi)

व्हिडिओ

दरमयान, पाऊस आणि पूरग्रस्त भागात NDRF च्या 10 तुकड्या स्थानिक प्रशासनाच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य करत आहेत. पाठीमागील 24 तासांपासून या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत होता. आता पाऊस कमी झाल्याची माहिती आहे.