UP BJP Leader Arrested In Gangrape Case: विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी भाजप नेता डॉ. श्याम प्रकाश द्विवेदी याला अटक

अनिल द्विवेदी यांची प्रयागराज येथील एक चर्चित भाजप नेता अशी ओळख आहे. सध्या ते भाजप यूवा मोर्चाचे काशी विभागाचे अध्यक्ष आहेत. द्विवेदी यांचे वडील रामरक्षा द्विवेदी हे प्रयागराजचे भाजप जिल्हाध्यक्षही राहिले आहेत.

Gangrape | | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

उत्तर प्रदेशमधील एका भाजप युवा नेत्याला सामूहिक बलात्कार (Gangrape) प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. डॉ श्याम प्रकाश द्विवेदी (BJP leader Dr. Shyam Prakash Dwivedi) असे या भाजप नेत्याचे नाव आहे. कला शाखेत शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याचा द्विवेदी याच्यावर आरोप आहे. डॉ. शाम प्रकाश द्विवेदी (Dr. Shyam Prakash Dwivedi) याला कर्नलगंज पोलीस (Colonelganj Police) पथकाने अटक केली. प्राथमिक चौकशी नंतर द्विवेदी याची रवानगी तुरुंगात करण्याच्या हालचाली सुरु असल्याचे समजते. शहर एसपी दिनेश कुमार सिंह (SP City Dinesh Kumar Singh) यांनी माहिती देताना सांगितले की, तपास आणि साक्षी पुराव्यांच्या आधारे आरोपीला कायद्यानुसार योग्य ती शिक्षा केली जाईल. दरम्यान, या प्रकरणातील आणखी एक आरोपी डॉक्टर अनिल द्विवेदी याला पोलिसांनी आगोदरच अटक करुन त्याची रवानगी तुरुंगात केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, कला शाखेत (बीए) शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थीनीवर 15 दिवसांपूर्वी डॉ. श्याम प्रकाश द्विवेदी आणि त्याचा सहकारी डॉ. अनिल द्विवेदी याने पिस्तुलाचा धाक दाखवून विद्यार्थीनीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. या घटनेबाबत माहिती पुढे येताच एकच खळबळ उडाली. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन कर्नलगंज पोलीस्ट ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच पुढील तपास सुरु केला. पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर 164 नुसार जवाब नोंदवला. त्यानंतर काही वेळातच सहआरोपी डॉ. अनिल द्विवेदी याला अटक करुन तुरुंगात पाठवले. परंतू, तक्रार आणि गुन्हा दाखल होऊनही पोली अद्यापपर्यंत भाजप नेता डॉ. श्याम प्रकाश द्विवेदी याच्यापर्यंत पोहोचली नव्हती. त्यामुळे विरोधकांनी पोलिसांवर निशाणा साधला होता. तसेच, चौकात पोस्टर्सही झळकवली होती. (हेही वाचा, BJP MLA Surendra Singh: मुलींवर चांगले संस्कार करा, बलात्कार थांबतील- भाजप आमदार)

बलात्काराचा आरोप असलेल्या आरोपीला अद्यापपर्यंत अटक झाली नसल्याने पोलीस काहीशी बॅकफूटवर गेली होती. परंतू आता दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, डॉ. श्याम प्रकाश द्विवेदी आणि त्याचा सहकारी डॉ. अनिल द्विवेदी यांनी लैंगिक अत्याचाराबाबात वाच्यता करु नये यासाठी पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांना धमकी दिली होती. पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार भाजप नेता श्याम प्रकाश द्विवेदी याने तिला जबरदस्तीने आपल्या हॉटेलवर बोलावले. तिथे तो आपला दोस्त डॉ. अनिल द्विवेदी याच्यासोबत बसला होता. इथे त्यांनी तिच्यावर बलात्कार केला.

आठ मार्च या दिवशीह डॉ. अनिल आणि श्याम हे दोघे पीडितेच्या घरात घुसले होते. पीडितेच्या घरातही दोघांनी तिच्यावर बलात्कार केला होता. द्विवेदी यांच्यापासून जीवाला धोका असल्याने पीडिता आणि कुटुंबीयांनी प्रदीर्घ काळ तोंड बंद ठेवले. अखेर त्यांनी तक्रार दिली. डॉ. अनिल द्विवेदी यांची प्रयागराज येथील एक चर्चित भाजप नेता अशी ओळख आहे. सध्या ते भाजप यूवा मोर्चाचे काशी विभागाचे अध्यक्ष आहेत. द्विवेदी यांचे वडील रामरक्षा द्विवेदी हे प्रयागराजचे भाजप जिल्हाध्यक्षही राहिले आहेत.