UPSC Prelims Result 2023 Declared: यूपीएससी प्रीलियम परीक्षेचा निकाल जाहीर, कुठे आणी कसे पाहाल Scorecards?

ही परीक्षा 28 मे रोजी घेण्यात आली होती. upsc.gov या संकेतस्थळावर दिलेल्या अधिकृत माहितीनुसार या परीक्षेत 14, 624 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

UPSC | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (Union Public Service Commission) घेण्यात येणाऱ्या प्रीलियम म्हणजेच पूर्वपरीक्षेचा निकाल ( UPSC Civil Services Prelims) जाहीर झाला आहे. ही परीक्षा 28 मे रोजी घेण्यात आली होती. upsc.gov या संकेतस्थळावर दिलेल्या अधिकृत माहितीनुसार या परीक्षेत 14, 624 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व उमेदवार UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात. उत्तीर्ण झालेले एकूण 14,624 उमेदवार पुढील फेरीसाठी, म्हणजे UPSC मुख्य परीक्षा 2023 मध्ये बसण्यासाठी पात्र ठरले आहेत.

यूपीएससी प्रीलिम्स निकाल कसा पाहाल?

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ही भारतातील एक घटनात्मक संस्था आहे. जी विविध परीक्षांचे आयोजन आणि नागरी सेवा आणि सरकारमधील इतर प्रतिष्ठित पदांसाठी उमेदवार निवडण्यासाठी जबाबदार आहे. याची स्थापना 1 ऑक्टोबर 1926 रोजी झाली आणि याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. (हेही वाचा, MHT CET Result 2023 Declared: एमएचटी सीईटी निकाल जाहीर; www.mahacet.org आणि www.mahacet.in वरुन कसे डाऊनलोड कराल PCB, PCM गुणपत्र)

UPSC चे प्राथमिक कार्य नागरी सेवा परीक्षा (CSE) आयोजित करणे आहे. जी भारतातील सर्वात कठीण आणि सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा परीक्षांपैकी एक मानली जाते. भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS), भारतीय विदेश सेवा (IFS) आणि इतर केंद्रीय नागरी सेवांसाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी CSE दरवर्षी आयोजित केले जाते.

CSE व्यतिरिक्त, UPSC इतर अनेक परीक्षा देखील घेते, ज्यात भारतीय सशस्त्र दलात उमेदवारांची भरती करण्यासाठी एकत्रित संरक्षण सेवा परीक्षा (CDSE), राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) परीक्षा, भारतीय वन सेवा परीक्षा आणि अभियांत्रिकी सेवा परीक्षा आदींचाही समावेश आहे.