UP: वसतिगृहातून तीन विद्यार्थिनी बेपत्ता, पोलिसांनी सुरू केला शोध, उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील कस्तुरबा गांधी मुलींच्या वसतिगृहातील घटना

माहिती मिळताच पोलिसांनी वसतिगृहात पोहोचून मुलींचा शोध सुरू केला. याबाबत माहिती अशी की, सोमवारी रात्री तिन्ही मुली वसतिगृहात हजर होत्या आणि आपापल्या खोलीत झोपल्या होत्या. मात्र मंगळवारी सकाळी त्या खोलीत आढळून आल्या नाहीत.

UP

UP: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील वसतिगृहातून तीन विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी वसतिगृहात पोहोचून मुलींचा शोध सुरू केला. याबाबत माहिती अशी की, सोमवारी रात्री तिन्ही मुली वसतिगृहात हजर होत्या आणि आपापल्या खोलीत झोपल्या होत्या. मात्र मंगळवारी सकाळी त्या खोलीत आढळून आल्या नाहीत. गाझियाबादमधील कस्तुरबा गांधी मुलींच्या वसतिगृहात ही घटना घडली. या घटनेनंतर वसतिगृह प्रशासनही अलर्ट मोडवर आले आहे. पोलीस सतर्क असून विद्यार्थिनींचा शोध सुरू करण्यात आला आहे. या घटनेनंतर उत्तर प्रदेशातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. हे देखील वाचा:  Pooja Khedkar Case: पूजा खेडकर हिमनगाचे टोक; अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र नोंदणी रॅकेट; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

गाझियाबादच्या वसतिगृहातून तीन विद्यार्थिनी बेपत्ता 

प्रकरणी पोलिसांनी विद्यार्थिनींची नाव व पत्ते नोंदवले असून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला जात आहे. यासोबतच वसतिगृहात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरही नजर ठेवण्यात येत आहे. पोलिस शाळेतील कर्मचाऱ्यांचीही चौकशी करत आहेत. या घटनेनंतर शहरात भीतीचे वातावरण आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif