IPL Auction 2025 Live

केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या आई, भाजप नेत्या चंद्रकांता गोयल यांचे निधन; नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, रोहित पवार, यांच्यासहित 'या' राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल (Union Railway Minister Piyush Goyal) यांच्या आई आणि मुंबई भाजपाच्या (BJP Mumbai) प्रसिद्ध नेत्या चंद्रकांता गोयल (Chandrakanta Goyal) यांचे आज 6 जून रोजी दुःखद निधन झाले आहे.

Chandrakanta Goyal (Photo Credits: Twitter/@PiyushGoyal)

केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल (Union Railway Minister Piyush Goyal)  यांच्या आई आणि मुंबई भाजपाच्या (BJP Mumbai)  प्रसिद्ध नेत्या चंद्रकांता गोयल (Chandrakanta Goyal)  यांचे आज 6  जून रोजी दुःखद निधन झाले आहे. त्या 88 वर्षाच्या होत्या. मुंबईतील माटुंगा (Matunga) विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांता या यापूर्वी आमदार होत्या. पियुष गोयल यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली. यांनंतर, नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), आमदार रोहित पवार (Rohit Pawar) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) , केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) , पूनम महाजन (Poonam Mahajan), पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी खास ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच पियुष गोयल व परिवाराचे  सांत्वन करत त्यांना आधार दिला आहे.

पियुष गोयल यांनी ही दुःखद बातमी देताना एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. “आपल्या आपुलकीने प्रेमाने मला मार्ग दाखवणारी माझी आई चंद्रकांता गोयल यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांनी संपूर्ण जीवनभर लोकांची सेवा केली. तसेच त्यांनी मलाही लोकांची सेवा करावी अशी प्रेरणा दिली. देव त्यांना त्यांच्या चरणाशी जागा देवो, ॐ शांती,” असे ट्विट पियुष गोयल यांनी केले आहे.

पियुष गोयल ट्विट

नितिन गडकरी ट्विट

देवेंद्र फडणवीस ट्विट

सुप्रिया सुळे ट्विट

स्मृती इराणी ट्विट

पूनम महाजन ट्विट

रोहित पवार ट्विट

पंकजा मुंडे ट्विट

दरम्यान, गोयल कुटुंब हे पूर्णतः जनसंघ आणि भाजपाशी संबंधित आहे. चंद्रकांता गोयल यांचे पती वेद प्रकाश गोयल हे अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये भाजप नेते आणि जहाज वाहतूक मंत्री देखील होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी गोयल कुटुंबाचे खास नाते होते.