Ram Vilas Paswan Heart Surgery: केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांची प्रकृती बिघडली, रात्री उशीरा हृदय शस्त्रक्रिया; लोजपा अध्यक्ष चिराग पासवान यांची माहिती

काल रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. गरज पडल्यास आणखी एखादी शस्त्रक्रिया करावी लागेल.

Ram Vilas Paswan | (Photo Credits: Facebook)

बिहार विधानसभा निवडणूक 2020 जाहीर झाली आहे. त्यामुळे राज्यभर निवडणुकांचा माहोल सुरु आहे. एनडीए (NDA ) घटक पक्ष असलेला लोकजनशक्ती पार्टी (LJP) जागावाटपाच्या मुद्द्यावरुन चर्चा करत आहे. अशातच लोकजनशक्ती पार्टी संस्थापक रामविलास पासवान (Ram Vilas Paswan) यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त आहे. दिल्ली येथील एका रुग्णालयात पासवान यांच्यावर उपचार सुरु आहेत. लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि रामविलास यांचे चिरंजीव चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी रामविलास पासवान यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.

चिराग पासवान यांनी सोशल मीडिया अकाउंटवरुन माहिती देताना म्हटले आहे की, राम विलास पासवान यांच्यावर शनीवारी रात्री उशीरा हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी शक्यता वर्तवली आहे की, त्यांच्याव येत्या काही दिवसात आणखी काही शस्त्रक्रिया कराव्या लागू शकतात.

चिराग पासवान यांनी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'गेल्या काही काळापासून वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काल रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. गरज पडल्यास आणखी एखादी शस्त्रक्रिया करावी लागेल असे डॉक्टरांनी म्हटले आहे. संकटाच्या या काळात माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद.' (हेही वाचा, Bihar Assembly Election 2020: राजद, काँग्रेस महाआघाडीचे जागावाटप जाहीर; जदयू, भाजप साधरणार आजचा मुहूर्त? NDA टीकणार की फुटणार?)

दरम्यान, गेल्या काही काळापासून केंद्रीय मंत्री राम विलास पासवान हे प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त आहेत. दिल्ली येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पासवान यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. याबद्दल चिराग पासवान यांनी ट्विट करुन माहिती दिली व आभार व्यक्त केले आहेत.