Union Budget 2024: विकसित भारत साठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून 9 गोष्टींना प्राधान्य; गरीब, महिला, युवा आणि शेतकरी यांच्यासाठी पहा महत्त्वाच्या घोषणा कोणत्या?

विकसित भारत साठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून 9 गोष्टींना प्राधान्य देण्यात देत बजेट सादर करण्यात आलं आहे.

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज मोदी सरकार 3.0 चा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यामध्ये विकसित भारत साठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून 9 गोष्टींना प्राधान्य देण्यात आलं आहे असं त्यांनी भाषणाच्या सुरूवातीला म्हटलं आहे. कृषी क्षेत्रातील उत्पादकता, रोजगार कौशल्य समावेशी मनुष्यबळ विकास आणि सामाजिक न्याय उत्पादन आणि सेवा शहरी विकास ऊर्जा सुरक्षा इन्फ्रा इनोव्हेशन, R&D नेक्स्ट-जनरेशन सुधारणा यांचा त्यामध्ये समावेश आहे. Union Budget 2024 Live Streaming: अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग सातव्यांदा मांडणार अर्थसंकल्प; इथे पहा मोदी सरकार 3.0 चं पहिलं बजेट! 

शेतकर्‍यांसाठी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातील घोषणा

नवीन 109 उच्च-उत्पादक आणि हवामानास अनुकूल असलेल्या 32 शेतातील आणि बागायती पिकांच्या जाती यांची माहिती शेतकर्‍यांना दिली जाणार आहे. पुढील 2 वर्षात, 1 कोटी शेतकऱ्यांना प्रमाणपत्र आणि ब्रँडिंगद्वारे समर्थित नैसर्गिक शेती करण्यास सुरुवात करण्यास प्रवृत्त केले जाणार आहे.

युवांसाठी मह्त्त्वाच्या घोषणा

देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सरकार आर्थिक सहाय्य देणार आहे. तरूणांसाठी कर्जाच्या रकमेच्या 3 टक्के व्याज सवलतीसह सरकार दरवर्षी 1 लाख विद्यार्थ्यांना थेट ई-व्हाउचर देणार आहे. राज्य, उद्योग यांच्या सहकार्याने कौशल्य निर्मितीसाठी केंद्र पुरस्कृत नवीन योजना जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये 5 वर्षात 20 लाख तरुणांना कुशल बनवण्याचा प्रयत्न असणार आहे. 500 टॉप कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार एक योजना सुरू करणार आहे, ज्यामध्ये 5000 रुपये प्रति महिना इंटर्नशिप भत्ता आणि 6000 रुपये एकवेळ मदत आहे. रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणासाठी पंतप्रधान ५ योजनांच्या पॅकेजची घोषणा. या योजनांमुळे ५ वर्षांत ४ कोटी १० लाख युवकांना रोजगार मिळणार आहे.

 

महिलांसाठी खास घोषणा

महिलांच्या कर्मचाऱ्यांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कार्यरत महिला वसतिगृहे स्थापन करणार आहे असे आज सीतारमण यांनी म्हटलं आहे. महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी 3 लाख कोटींची तरतूद. महिलांच्या नावे घेतलेल्या प्रॉपर्टी वर मुद्रांक शुल्क कमी करण्यात आले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif